क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे. तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...
।। युग स्त्री-सावित्रीबाई ज्योतिबा फुले ।। परदेशातून भारतात आलेल्या आर्यांनी परमेश्वराच्या नावाने चार वर्णाची निर्मिती करुन मूळ रहिवाशी भारतीयांना शुद्र वर्णात टाकले. ह्या शुद्रांना (आजचा बहुजन समाज ) ६००० जातीमध्ये विभागून त्यांच्यात उच्चनीचतेची विषारी भावना रुजविली. बहुजन समाजाला दैववादी व अंधश्रध्दाळू बनवीले व आपल्या भजनी लावले. काल्पनिक देवधर्माच्या, स्वर्ग-नरकाच्या व पाप-पुण्याच्या मोहजालात गुरफटवून मानसिक व शारिरीक गुलामगिरीत बहुजानांना बंदिस्त करुन ठेवले. हा प्रकार गेली पांच हजार वर्षापासून या देशात चालत आलेला आहे. अशा मनुवादी जाचक व अनिष्ठ रुढी परंपरेवर म. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले ह्यांनी प्रखर हल्ला चढविला. सावित्रीबाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगांव या गावी झाला. सन १८४० मध्ये त्यांचा विवाह ज्योतीराव फुलेशी झाला. ढोल गवॉंर शुद्र पशु नारी, सब ताडन के अधिकारी ! तुलशीदास (रामचरित मानस ) ह्या प्रमाणे मनुवादी व्यवस्थेत ’नारी’ ही सुध्दा शुद्रच होती. म्हणून शुद्राप्रमाणे स्त्रियांना सुध्दा शिक्षणापासून वंचीत ठेवले होते. शिक्ष...