Skip to main content

Posts

Showing posts from January, 2020

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

मास्तरची व्यथा

मास्तरची व्यथा मास्तर आता कायमचे शहराकडे आलेत. पण सारी हयात वाड्या वस्त्यांवर तालुका मास्तर म्हणून घालवलेल्या मास्तरांचा जीव काही इकडे रमत नाही. वयाने आता थकलेत. "पण माज्या माघारी हातानं करून खाऊ नका! तुमचं सगळं आयुष्य उपासमारीतच गेलंय! आपल्या पोरांच्याकडं जाऊन रहावा!" असं अखेरचा श्वास घेताना मास्तरीनबाईनी सांगिल्यामुळे मास्तर शहरवाशी झालेत. मास्तरांची दोन्ही मुलं जवळ जवळच राहतात. थोरला ईस्टला तर धाकटा वेस्टला. पण रेल्वेलाईनवरचा तो लोखंडी ब्रिज ओलांडताना काळानुसार मास्तरांचे गुडघे आता भरून येतात. चढताना त्यांना धाप लागते. भर गर्दीत एखाद्या पायरीवर बसून राहतात. शहरात आल्यावर मास्तर धाकट्याकडे होते. नंतर नंतर त्या किचन मधली भांडी वाजल्यावर मास्तर आता सकाळचे थोरल्याकडे जेवतात. संध्याकाळी धाकट्याकडे. थोरला मुलगा मास्तरांशी जास्त बोलत नाही. पण त्याची बायको मास्तरांशी चांगलं वागते. धाकटा पोरगा चांगला आहे पण बायको नाही. तिला आल्या गेलेली घरी नको असतात. सतत धुसपुस करीत राहते. पण मास्तरांचा लेका सुनापेक्षा नातवंडातच जीव रमतो. आता तीच त्यांच्या जगण्याची आधार केंद्रे बनलीत... पहाटे

बहिर्जी नाईक यांचे गुप्तहेर खाते व त्याची स्वराज्यातील उत्तुंग कामगिरी

बहिर्जी नाईक यांचे गुप्तहेर खाते व त्यांची स्वराज्यातील उत्तुंग कामगिरी............. #स्वराज्याचे_गुप्तहेर_बहिर्जी_नाईक," मूळ बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलविण्यात पांरगतअसलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून मराठी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. महाराजांनी त्यांच्यातले कसब ओळखले स्वराज्यनिर्र्मितीच्या कामाला उपयोगी पडतील हे जाणून त्यांना त्या गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले. बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत, आदी कुठलेही वेशांतर करण्यात पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होते. ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व खुद्द अदिलश

राजमाता जिजाऊ(संकलित लेख,लेखकाच्या नावासह साभार)

 (कॉपी पेस्ट लेखकाच्या नावासह साभार) रयतेच्या राज्यासाठी जिजाऊंचा संघर्ष आजही मार्गदर्शक आहे. राजमाता जिजाऊ जयंतीच्या सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा.त्यानिमित्ताने हा लेख 12जाने 2019 अभिवादनपर लिहलेला आहे,तो Re post करीत आहे. आवडल्यास निश्चित प्रतिक्रिया देणे,share/forward करणे. रामेश्वर त्रिमुखे, जालना. Mob.9420705653. जिजाऊ म्हणजे विदर्भाची कन्या,मराठवाड्याची सून, कर्मभूमी पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीचा परिसर,तर स्वराज्य राजधानी आणि देहत्याग कोकणात.त्यामुळे साक्षात संपूर्ण महाराष्ट्रात कार्य,कर्तृत्व आणि जीवन. राजमाता मासाहेब जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 ला सिंदखेड जिल्हा बुलढाणा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव म्हाळसाराणी होते.त्यांना दत्ताजी,अचलोजी, राघोजी आणि बहादुरजी हे भाऊ होते.जिजाऊंनी मराठी, फार्सी,संस्कृत,उर्दू,हिंदी, तेलगू या भाषा अवगत करून घेतल्या. याचबरोबर घोडेस्वारी,तलवारबाजी, राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना घरातूनच मिळाले. इसवीसन 1610 ला वेरुळचे भोसले घराण्यातील शहाजी भोसले यांच्याशी जिजाऊंचा विवाह वेरूळ येथे झाला. शहाजीमहाराज

अध्ययन निष्पत्ती

अध्ययन निष्पत्ती Post on Date ०६/०१/२०१७ मिञांनो, ३री व ४थी या इयत्तेसाठी मराठी विषयाअंतर्गत *"प्रतिसादात्मक बोलणे"* हा उपक्रम राबविला असता विध्यार्थांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. उपक्रमाचा मुख्य हेतू *चर्चेत सहभागी होणे व आपले स्वत:चे मत विशद करणे/ मांडणे* हा होता. *आई आपल्यासाठी काय काय करते?* हा विषय गटात चर्चेसाठी  दिला व मुलांना गटात प्रथम चर्चा करण्यास सांगितले व नंतर प्रत्येक विध्यार्थांना आईविषयी एक-एक वाक्य फलकावर स्वत:च्या शब्दात लिहिण्यास सांगितले असता मुलांनी सुंदर हस्ताक्षरात आईविषयी खुप चांगली वाक्यरचना तयार केली. मिञांनो,बरेचसे परिचित विषय गटात चर्चेसाठी ठेवू शकतो. जसे ~मी पाहिलेली जञा,  माझी सुंदर शाळा, माझे आवडते शिक्षक, आवडता खेळ आदि. अध्ययन निष्पत्ती~(०१) स्वत:चे शब्द स्वत:च्या शब्दात विशद केल्याचा आनंद होणे. (०२) प्रमाण भाषा व बोलीभाषा यातील फरकाची जाणीव होणे. (०३) भाषेच्या माध्यमातून विचारांचा विकास होणे. (०४) प्रसंगानुरूत, व्यक्तिनुसार  योग्य प्रकारे संवाद साधता येणे. (०५) आपले विचार, भावना, कल्पना व अनुभव व्यक्त करता येणे. (०६) लेखनातून

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस