Skip to main content

Posts

Showing posts from August, 2018

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

Understand the life

*Beautiful Message*       لكن  تذكر  ان  ما تصنعه  الْيوم  لنفسك  ستكسبه في  الغد  سالبا  او  موجبا  لكن  تذكر  أيضا  ان  الحياة  عبر  قال تعالى  فَاعْتَبِرُوا يَا أُولِي الْأَبْصَارِ وايضاً قال  فَاتَّقُوا اللَّهَ يَا أُولِي الْأَلْبَابِ الَّذِينَ آمَنُوا A rich man looked through his window and saw a poor man picking something from his dustbin ... He said, Thank GOD I'm not poor; *نظر أحد الأغنياء من خلال نافِذتِه فرأى فقيراً يلتقط شيئاً ما من سلَّة القُمامَة فَحَمَد الله وشَكَرَهُ أنه ليس فقيراً*؛   The poor man looked around and saw a naked man misbehaving on the street ... He said, Thank GOD I'm not mad; *نظر الرجل المسكين حوله وشاهد رجُلاً عارياً يُسِيء السلوك في الشارع وقال الحَمْدُ لله أني لسْتُ بِمَجْنُون*؛ The mad man looked ahead and saw an ambulance carrying a patient ... He said, Thank GOD am not sick; *نظر الرجل المجنون إلى الأمام ورأى سيارة إسعاف تَقِلُ مَرِيضًا وقال الحمد لله أَنِي لسْتُ مَرِيضًا*؛ Then a sick person in hospital saw a troll

लोदगा सहविचार सभा

✅आज *लोदगा* व *सेलू* या दोन केंद्रांतर्गत मुख्याध्यापकांची संयुक्त बैठक *सन्माननीय केंद्रप्रमुख  उमाकांत जाधव* सर  यांनी  दोन्ही केंद्रांच्या केंद्रीय मु. अ.  समवेत जि.प.प्रा.शा. बुधोडा  येथे घेतली.   या वेळी    Diecpd चे ITविषय सहाय्यक *मा.सतीश    सातपुते* यांची विशेष उपस्थिती होती.                 ✅या बैठकीत पुढील मुद्दे  चर्चिले गेले व त्यानुसार निर्णय घेण्यात आले:🌈                ✅1)दि.23जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त सुट्टी असल्यामुळे *अध्ययन स्तर निश्चिती* 24जुलै ते 28 जुलै दरम्यान होणार असून इयत्ता1ली वर्गाचीही स्तर निश्चिती करावयाची आहे.                                ✅2)विद्यार्थी ज्या स्तरावर  आहे,त्या रकान्यात टिम्ब(dot)द्यायचा आहे जेणेकरून विद्यार्थी उच्च  स्तरावर गेल्यास डॉट वर ❎फुली मारून पुढच्या रकान्यात डॉट देता येईल अशी माहिती  Diecpd चे IT विषय सहाय्यक *मा.सतीश सातपुते* यांनी दिली.               ✅3)अध्ययन स्तर निश्चिती   दरम्यान तालुकास्तरीय अधिकारी भेट देणार आहेत.✅4)अध्ययन स्तर निश्चिती नंतर त्याच दिवशी गुगल लिंक     भरण्यात येणार आहे.                       ✅5) *जा

शिक्षण व्यवस्थेतील नवे आयाम

*शिक्षण व्यवस्थेतील नवे आयाम  - मुलाखत - डॉ. सुनिल मगर* दूरदर्शन "सह्याद्री" वाहिनीवर दि. 24 जुलै 2018 रोजी. सुनील दुपारी 2.00 ते 3.00 या वेळेत *"शिक्षण व्यवस्थेतील नवे आयाम"* या विषयावर डॉ. सुनिल मगर , संचालक, म.रा. पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( विद्या प्राधिकरण), पुणे यांची "हेलो सखी" या कार्यक्रमामध्ये झालेली मुलाखत आपण खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता. https://youtu.be/XF5rvdVSYyc

अण्णा भाऊ साठे यांचे तत्त्वज्ञान

*बहुजन चळवळीचे महानायक*: *अण्णा भाऊ साठे*                           अण्णा भाऊ साठे हे नाव आता उभ्या  महाराष्ट्राला सुपरिचित झाले आहे .1 ऑगस्ट1920 रोजी वाटेगाव ता. वाळवा जि.सांगली येथे वालुआई आणि भाऊराव साठे या दांपत्याच्या पोटी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. खरेतर जन्म कोठे घ्यावा हे कोणत्याही व्यक्तीच्या हाती नसते. पणआयुष्य कसे जगायचे हे मात्र त्या व्यक्तीच्या हाती असते. अण्णा भाऊंचा जन्म हा अठराविश्वे दारिद्र्य पाचवीला पुजलेल्या मातंग या दलित जातीत झाला. जात ही भारतीय समाज व्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण आहे . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती या अराष्ट्रीय आहेत असे भाष्य केलेले आहे. तरीही जातीचे वलय व्यक्ती पासून तुटत नाही. जात हा वेगळा विषय असला तरी अण्णा भाऊंचे मूल्यांकन करताना जातीच्या परिप्रेक्षातून त्यांच्याकडे पाहिले जाते. ही बाब तशी कोणत्याही व्यक्तीला समजून घेताना अडसर ठरणारी किंवा त्या व्यक्तिमत्त्वावर अन्याय करणारी ठरू शकते. तेव्हा जातीच्या पलीकडे जाऊन अण्णा भाऊंना समजून घ्यावे लागेल. एक बाब या अनुषंगाने नमूद करता येईल ती म्हणजे व्यक्ती समजून घेताना तिचा विचार, जीवनविषयक दृष्

welcome post

नमस्कार,  मी डॉ बालाजी समुखराव.  माझ्या ब्लॉगवरआपले स्वागत करतो. या ब्लॉगच्या माध्यमातून शैक्षणिक बाबींविषयी आपणास खूप काही माहिती मिळेल. चला तर मग ब्लॉगची सफर करू या.

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस