Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांचे उत्तुंग यश

रेणुकादास देवणीकर आज तहसीलदार पदी विराजमान झाले आहेत;परंतु त्यांचा आजपर्यंतचा प्रवास हा नक्कीच काट्याकुट्यानी भरलेला आहे.देवणी सारख्या एका छोट्या गावातून एका शिक्षकाचा मुलगा तालुका दंडाधिकारी होतो ,ही नक्कीच भूषणावह बाब आहे,विशेष म्हणजे तेही एका दलित समूहातून असल्यामुळे या यशाला नक्कीच सोनेरी किनार आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.वडिलांचे छत्र हरवल्यानंतर रेणुकादास यांनी राजर्षी शाहू महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घेतला;पण या संस्कृतीत त्यांचा पिंड रमला नाही,त्यांनी घरच्यांना न सांगता उदगीर या तालुक्याच्या ठिकाणी कला शाखेत प्रवेश घेतला.वडिलांची प्रेरणा कायम सोबत होती.'मच्छिन्द्र सारखे टॉपला जा' हा वडिलांचा संदेश त्यांनी काळजात कोरला होता.मच्छिंद्र देवणीकर हे त्यांच्या भावकीतील व्यक्ती तेव्हा MPSC मार्फत निवड होऊन उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत होते.वडील गेल्यामुळे कसलेही मार्गदर्शन नव्हते,त्यामुळे आपण शोधावी तीच वाट,ती कधी खाच खळग्यांनी भरलेली ,तर काट्याने पाय आणि मनही कितीदा तरी रक्तबंबाळ झाले.पण चालणे थांबले नाही.बी ए झाले,एम ए झाले,पण हा बावन्नकशी हिरा झाकून र

बीजांड ते ब्रह्मांड----डॉ महेंद्र वंटे

त्रिकाल सत्य: एक अतिशय सुंदर लेख नक्की वाचा! खूप पूर्वीचा *"बिजांड ते ब्रम्हांड"* हा *डॉ. महेन्द्र वंटे* यांचा लेख वाचनांत आला. हा लेख वाचल्यावर हे एका डॉक्टरचे शब्द आहेत यावर विश्वासच बसत नाही! हे शब्द असेच सुचले नाहीत तर ते त्यांच्या शब्दामधून त्यांच्या अंतर्मनातील भाव, आईचे प्रेम आणि तिच्या प्रति असलेली कृतज्ञतेची तळमळ व्यक्त होतेय.   *नक्की वाचा!*  खात्री आहे की हा लेख वाचल्यावर आपणसुद्धा आपल्या अंतर्मनाशी बोलल्याशिवाय राहणार नाही. *बीजांड ते ब्रह्मांड :* वयोपरत्वे तोल जाऊन पडल्याने आई अंथरुणाला खिळली ती कायमचीच. सर्व अवयव नव्वदीतले. झिजलेल्या कंबरेवरचा मुक्कामार तिला कायमचा परावलंबी करून गेला. पाय उचलणं सुद्धा अशक्य झालं. तिच्या संवेदना कमी झाल्याने सगळे सोपस्कारही कपड्यातच. वृद्धत्व सोडून दुसरा आजार नव्हता. पण म्हातारपण म्हणजे सुकून जिर्ण झालेलं बालपण. तोच हटवाद आणि वागणंही तसंच लहरी. सल्ला मसलतींचा पाउस पडला. लाख मोलाच्या आईसाठी काही हजाराची केअरटेकर! मनाला पटेना. अनेक पर्यांयांचा उहापोह झाला. आम्हा दोघांची कामं अत्यावश्यक सेवेतली. सलग सुट्ट्यांचादुष्काळ. मग मीच ठरवलं

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस