Skip to main content

Posts

Showing posts from 2021

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

क्रांतिगुरु लहुजी साळवे ग्रंथ मिळवा

* क्रांतिगुरु लहुजी साळवे* हा परिवर्तनवादी चळवळी साठी मोठाच संदर्भग्रंथ ठरावा असा ग्रंथराज आपणासाठी उपलब्ध झाला आहे.महाराष्ट्रातील 46 मान्यवर अभ्यासक , संशोधक,लेखक,चिंतक, चळवळीतील कार्यकर्ता यांच्या साक्षेपी लेखणीतून निर्मित झालेला हा अमूल्य असा ग्रंथराज आहे.आजपर्यंत *क्रांतिगुरु लहुजी साळवे* यांच्यावर उपलब्ध असलेल्या ग्रंथांपैकी सर्वोत्तम असा हा ग्रंथ आहे. *क्रांतिगुरु लहुजी साळवे* यांच्या ऐतिहासिक कार्याचे संशोधक दृष्टीतून तर्कशुद्ध विवेचन करण्यात आले असून त्यांच्या प्रत्येक पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्यांच्यावर घेतले जाणारे आक्षेप साधार खोडून काढले आहेत.तेव्हा असा हा सर्वांगाने विचार करणारा आणि वाचकाला विचार करायला लावणारा महाग्रंथ आपल्या सेवेत रुजू करताना संपादक म्हणून आम्हांला नक्कीच आनंद होत आहे.*इतिहास लेखन* कसे असले पाहिजे याचा उत्तम नमुना म्हणून या महाग्रंथाकडे पाहता येईल.    ग्रंथाचे मुखपृष्ठ औरंगाबाद येथील चळवळीतील कार्यकर्ता एक मनस्वी कलावंत *सरदार जाधव* यांनी रेखाटले असून इतिहासाबद्दल आवड आणि वर्तमानाचे भान ठेवायला लावणारे आहे.क्वा

आभार!आभार!!आभार!!!

आभार!आभार!! आभार!!!

आमदार संभाजी पाटील निलंगेकर साहेब यांनी पीएचडी धारक शिक्षकांचा प्रश्न विधानसभेत मांडल्यामुळे महाराष्ट्र विद्यावाचस्पती(Ph D) संघटनेतर्फे साहेबांचे कोटी कोटी आभार!!

तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांचे उत्तुंग यश

रेणुकादास देवणीकर आज तहसीलदार पदी विराजमान झाले आहेत;परंतु त्यांचा आजपर्यंतचा प्रवास हा नक्कीच काट्याकुट्यानी भरलेला आहे.देवणी सारख्या एका छोट्या गावातून एका शिक्षकाचा मुलगा तालुका दंडाधिकारी होतो ,ही नक्कीच भूषणावह बाब आहे,विशेष म्हणजे तेही एका दलित समूहातून असल्यामुळे या यशाला नक्कीच सोनेरी किनार आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.वडिलांचे छत्र हरवल्यानंतर रेणुकादास यांनी राजर्षी शाहू महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घेतला;पण या संस्कृतीत त्यांचा पिंड रमला नाही,त्यांनी घरच्यांना न सांगता उदगीर या तालुक्याच्या ठिकाणी कला शाखेत प्रवेश घेतला.वडिलांची प्रेरणा कायम सोबत होती.'मच्छिन्द्र सारखे टॉपला जा' हा वडिलांचा संदेश त्यांनी काळजात कोरला होता.मच्छिंद्र देवणीकर हे त्यांच्या भावकीतील व्यक्ती तेव्हा MPSC मार्फत निवड होऊन उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत होते.वडील गेल्यामुळे कसलेही मार्गदर्शन नव्हते,त्यामुळे आपण शोधावी तीच वाट,ती कधी खाच खळग्यांनी भरलेली ,तर काट्याने पाय आणि मनही कितीदा तरी रक्तबंबाळ झाले.पण चालणे थांबले नाही.बी ए झाले,एम ए झाले,पण हा बावन्नकशी हिरा झाकून र

बीजांड ते ब्रह्मांड----डॉ महेंद्र वंटे

त्रिकाल सत्य: एक अतिशय सुंदर लेख नक्की वाचा! खूप पूर्वीचा *"बिजांड ते ब्रम्हांड"* हा *डॉ. महेन्द्र वंटे* यांचा लेख वाचनांत आला. हा लेख वाचल्यावर हे एका डॉक्टरचे शब्द आहेत यावर विश्वासच बसत नाही! हे शब्द असेच सुचले नाहीत तर ते त्यांच्या शब्दामधून त्यांच्या अंतर्मनातील भाव, आईचे प्रेम आणि तिच्या प्रति असलेली कृतज्ञतेची तळमळ व्यक्त होतेय.   *नक्की वाचा!*  खात्री आहे की हा लेख वाचल्यावर आपणसुद्धा आपल्या अंतर्मनाशी बोलल्याशिवाय राहणार नाही. *बीजांड ते ब्रह्मांड :* वयोपरत्वे तोल जाऊन पडल्याने आई अंथरुणाला खिळली ती कायमचीच. सर्व अवयव नव्वदीतले. झिजलेल्या कंबरेवरचा मुक्कामार तिला कायमचा परावलंबी करून गेला. पाय उचलणं सुद्धा अशक्य झालं. तिच्या संवेदना कमी झाल्याने सगळे सोपस्कारही कपड्यातच. वृद्धत्व सोडून दुसरा आजार नव्हता. पण म्हातारपण म्हणजे सुकून जिर्ण झालेलं बालपण. तोच हटवाद आणि वागणंही तसंच लहरी. सल्ला मसलतींचा पाउस पडला. लाख मोलाच्या आईसाठी काही हजाराची केअरटेकर! मनाला पटेना. अनेक पर्यांयांचा उहापोह झाला. आम्हा दोघांची कामं अत्यावश्यक सेवेतली. सलग सुट्ट्यांचादुष्काळ. मग मीच ठरवलं

What is super 30 ? | सुपर 30 आहे तरी काय ?

  सुपर 30 आहे तरी काय ? नमस्कार मंडळी,आपणास माहित आहे का सुपर 30 आणि आनंदकुमार हे कोण आहेत? काय आहे सुपर 30 ?चला तर मग आपण पाहू या आपल्या मायबोलीत  ...         सुपर 30 ही कथा म्हणजे कादंबरीतील काल्पनिक परी-राक्षस यांची कथा नक्कीच नाही.तर टी आहे आनंदकुमार या बिहार मधील एका तरुणाची संघर्षगाथा! आनंदकुमारचे  बालपण :-           बिहार राज्यातील पाटणा या राजधानीच्या ठिकाणी चांदपूर बेला नावाची वस्ती आहे. या वस्तीत शान्तिकुटीर हे आनंद कुमारचे जन्मस्थान.त्याचा जन्म 1 जानेवारी १९७३ रोजी आई जयंतीदेवी व वडील राजेंद्र प्रसाद यांच्या पोटी झाला.म्हणजे आजपासून तब्बल ४८वर्षांपूर्वीचा बिहार किती मागासलेला असेल याची कल्पना आपणास येईल.७०% गरिबी, शिक्षणाचा अभाव अशा बिहारात आनंदकुमार याचा जन्म झाला.वडील राजेंद्र प्रसाद हे रेल्वे च्या मेल सेवेमध्ये पत्र छाननी करायचे.अतिशय तुटपुंजे वेतन.८बाय१० च्या खोलीत हे कुटुंब राहायचे.राजेंद्र प्रसाद सोबत त्यांचे लग्न झालेले भाऊ पण राहायचे.मोठे कुटुंब.आनंद कुमारचे शालेय शिक्षण सरकारी शाळेत झाले.आनंद शालेय जीवनात खूप धडपड्या स्वभावाचा होता. जिज्ञासू होता. सतत प्रयोग करा

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ   मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे.     तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस