Skip to main content

Featured Post

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ   मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे.     तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...

क्रांतिगुरु लहुजी साळवे ग्रंथ मिळवा

*क्रांतिगुरु लहुजी साळवे* हा परिवर्तनवादी चळवळी साठी मोठाच संदर्भग्रंथ ठरावा असा ग्रंथराज आपणासाठी उपलब्ध झाला आहे.महाराष्ट्रातील 46 मान्यवर अभ्यासक , संशोधक,लेखक,चिंतक, चळवळीतील कार्यकर्ता यांच्या साक्षेपी लेखणीतून निर्मित झालेला हा अमूल्य असा ग्रंथराज आहे.आजपर्यंत *क्रांतिगुरु लहुजी साळवे* यांच्यावर उपलब्ध असलेल्या ग्रंथांपैकी सर्वोत्तम असा हा ग्रंथ आहे. *क्रांतिगुरु लहुजी साळवे* यांच्या ऐतिहासिक कार्याचे संशोधक दृष्टीतून तर्कशुद्ध विवेचन करण्यात आले असून त्यांच्या प्रत्येक पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्यांच्यावर घेतले जाणारे आक्षेप साधार खोडून काढले आहेत.तेव्हा असा हा सर्वांगाने विचार करणारा आणि वाचकाला विचार करायला लावणारा महाग्रंथ आपल्या सेवेत रुजू करताना संपादक म्हणून आम्हांला नक्कीच आनंद होत आहे.*इतिहास लेखन* कसे असले पाहिजे याचा उत्तम नमुना म्हणून या महाग्रंथाकडे पाहता येईल.
   ग्रंथाचे मुखपृष्ठ औरंगाबाद येथील चळवळीतील कार्यकर्ता एक मनस्वी कलावंत *सरदार जाधव* यांनी रेखाटले असून इतिहासाबद्दल आवड आणि वर्तमानाचे भान ठेवायला लावणारे आहे.क्वालिटी पेपर वापरल्यामुळे वजनाने हलका परंतु विचाराने भारदस्त असा हा महाग्रंथराज आपल्या मनाची गुलामी संपवण्यासाठी आतुर झाला आहे.प्रत्येकाने  वाचलेच पाहिजे आणि  घरोघरी हा विचार पोचलाच पाहिजे.हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.सामाजिक बांधिलकीतुन किमान एक ग्रंथ तरी आपण घेतलाच पाहिजे.
   9922397710 या नंबर वर 300 रुपयांचे फोन पे करा लातूर शहराबाहेर  ग्रंथ पोस्टाने पाठवला जाईल, त्यासाठी पत्ता व पैसे पाठवलेली पावती 9284376494 या व्हाट्स अप क्रमांकावर पाठवावी.
   *संपादक*
*डॉ सुशीलप्रकाश चिमोरे*
*डॉ बालाजी समुखराव*

Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्...

स्वच्छ गाव माझा गाव