Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

शहाजीराजे भोसले जन्मदिन

.  🚩शहाजी राजे भोसले यांचा आज जन्मदिवस 🚩 . शहाजी राजांचा जन्म 18 मार्च 1599 रोजी  मालोजीराजे व दिपाबाई ऊर्फ ऊमाबाईसाहेब  यांच्या पोटी झाला  मालोजी व विठोजी हे दोन भोसले बंधू प्रथमतःफलटणच्या  वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांच्या बरोबर राहात  होते .मालोजीराजे यांच्या पराक्रमामुळे वणंगपाळ  नाईक-निंबाळकर यांनी आपली मुलगी दिपाबाई मालोजीराजे यांना दिली होती.नंतर त्यांचे नाव ऊमाबाई ठेवण्यात आले.   त्यांना दोन मुले एक शहाजी व दुसरे शरीफजी         मालोजीराजे यांच्या अकाली मृत्यूनंतर शहाजीराजे वयाच्या पाचव्या वर्षीच निजामशाहीचे जहागिरदार झाले. शहाजीराजे अत्यंत देखणे व तेजस्वी होते. त्यांची कीर्ती ही निजामशाही आणि आदिलशाहीत कदाचित इतर कुळातील सरदारापेक्षा  अधिक प्रस्तुत झालेली होती. शहाजी राजांच्या आई उमाबाई या एक धाडसी , दूरदृष्टी असलेल्या महिला होत्या .आणि त्यांच्या देखरेखीखाली शहाजीराजे घडले होते व वाढलेही होते .बालपणापासूनच राजकारण-समाजकारण त्यांना जवळून पाहता आले .त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला युद्धशास्त्र निपुणतेचे उच्चकोटीचे अधिष्ठान लाभले होते. त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले होत

नेट परीक्षेसंबंधी

*युजीसीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट व नेट जे.आर.एफ. परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; नेट परीक्षा 15 जून ते 20 जून  2020 दरम्यान होणार...                 युजीसी व NTA आयोजित राष्ट्रीय पात्रता परीक्षा 15  जून  ते 20 जून 2020 दरम्यान होणार आहे.        नेट व नेट जे.आर.एफ.परीक्षेचे बदललेले स्वरूप ■ नेट परीक्षा ३०० गुणांसाठी असते. ■ नेट परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतात. ■ पहिली प्रश्नपत्रिका ५० प्रश्न १०० गुणांसाठी तर दुसरी प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न २०० गुणांसाठी असतात व दुसरा पेपर हा विषयाशी संबंधित असते. ▪️ परीक्षेचा अर्ज ऑनलाईन ugcnet.nta.ac.in / www.nta.ac.in या वेबसाईटवर भरता येतील. ▪️ परीक्षेत दोन्ही प्रश्नपत्रिका दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सहा टक्के उमेदवार पात्र ठरवले जातील ▪️ त्यानंतर दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून किमान ४० टक्के (खुला प्रवर्ग) किंवा ३५ टक्के (आरक्षित प्रवर्ग) गुण मिळवलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार ▪️ त्यानुसार सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरवले जाईल. परीक्षा अर्ज म

जागतिक महिला दिन

🌻 आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च🌻 आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय एका कामगार आंदोलनातून झाला. 1908 साली याची पहिली ठिणगी पडली होती. यावर्षी 15 हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती. याशिवाय त्यांच्या इतर प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या होत्या - चांगलं वेतन मिळावं आणि मतदानाचा अधिकार मिळावा. या आंदोलनाच्या वर्षभरानंतर अमेरिकेतल्या सोशालिस्ट पक्षाने 8 मार्च हा पहिला राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला. ही कल्पनासुद्धा एका स्त्रीचीच होती. क्लारा जेटकीन यांनी 1910 साली कोपनहेगनमध्ये झालेल्या काम करणाऱ्या महिलांसाठीच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्या परिषदेत 17 देशांच्या 100 महिला सहभागी झाल्या होत्या. त्या सर्वांनीच प्रस्तावाला अनुमोदन दिलं. क्लारा जेटकीन सर्वप्रथम 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला होता. मात्र, तांत्रिकदृष्ट्या यावर्षी आपण 109वा जागतिक महिला दिन साजरा करत आहोत. 1975 साली संयुक्त राष्ट्रांनी हा ए

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस