Skip to main content

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

What is super 30 ? | सुपर 30 आहे तरी काय ?

 सुपर 30 आहे तरी काय ?


नमस्कार मंडळी,आपणास माहित आहे का सुपर 30 आणि आनंदकुमार हे कोण आहेत? काय आहे सुपर 30 ?चला तर मग आपण पाहू या आपल्या मायबोलीत  ...

        सुपर 30 ही कथा म्हणजे कादंबरीतील काल्पनिक परी-राक्षस यांची कथा नक्कीच नाही.तर टी आहे आनंदकुमार या बिहार मधील एका तरुणाची संघर्षगाथा!

आनंदकुमारचे  बालपण :-

         बिहार राज्यातील पाटणा या राजधानीच्या ठिकाणी चांदपूर बेला नावाची वस्ती आहे. या वस्तीत शान्तिकुटीर हे आनंद कुमारचे जन्मस्थान.त्याचा जन्म 1 जानेवारी १९७३ रोजी आई जयंतीदेवी व वडील राजेंद्र प्रसाद यांच्या पोटी झाला.म्हणजे आजपासून तब्बल ४८वर्षांपूर्वीचा बिहार किती मागासलेला असेल याची कल्पना आपणास येईल.७०% गरिबी, शिक्षणाचा अभाव अशा बिहारात आनंदकुमार याचा जन्म झाला.वडील राजेंद्र प्रसाद हे रेल्वे च्या मेल सेवेमध्ये पत्र छाननी करायचे.अतिशय तुटपुंजे वेतन.८बाय१० च्या खोलीत हे कुटुंब राहायचे.राजेंद्र प्रसाद सोबत त्यांचे लग्न झालेले भाऊ पण राहायचे.मोठे कुटुंब.आनंद कुमारचे शालेय शिक्षण सरकारी शाळेत झाले.आनंद शालेय जीवनात खूप धडपड्या स्वभावाचा होता. जिज्ञासू होता. सतत प्रयोग करायचा.टाकावूतून काही टिकाऊ निर्माण करता येते का हे तो पाही.त्याचे छोटेसे घर हीच त्याची प्रयोगशाळा. आनंद कुमारला गणिताची प्रचंड आवड होती.तो सतत गणिती आकडेमोड करीत राहायचा.

रामानंद स्कूल ऑफ mathematics ची स्थापना 

        तर अशा अत्यंत सामन्यातील सामान्य कुटुंबातून आलेला आनंदकुमार.त्याला उच्च शिक्षण परदेशात घ्यायचे होते.तेही केम्ब्रिज विद्यापीठात! गणितावर संशोधन करायचे होते.पण घरच्या अत्यन्त गरिबीमुळे त्याला केम्ब्रिज मध्ये प्रवेश घेता आला नाही.म्हणून तो नाउमेद झाला नाही.पुढे वडिलांचे छत्र हरपले.कुटुंबाची जबाबदारी डोक्यावर आली.अक्षरशः पापड विकून त्याने कुटुंब चालवले.पण गणिताची उर्मी त्याला गप्प बसू देत नव्हती.त्याने रामानंद गणित स्कूल स्थापन करून गणिताचे ट्युशन सुरु केले.केवळ चार विद्यार्थी घेवून त्याने क्लास सुरु केला.त्याचा शिकवण्याची कलाच वेगळी होती.वेगवेगळ्या पद्धतीने तो गणिताचे उत्तर काढीत असे.त्यामुळे विद्यार्थ्यांना मजा यायची.हे ट्युशन खुपच लोकप्रिय झाले.विद्यार्थी संख्या ५०० पर्यंत वाढली.जरा उत्पन्न बरे होवू लागले. पण आनंदच्या डोक्यात वेगळेच विचार घोंगावू लागले.

सुपर 30 ची संकल्पना :-

        त्याने गोरगरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी आय आय टी मध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी चक्क मोफत वर्ग घेण्याचे ठरविले.हे खूप मोठे धाडस होते.पण आनंदने मनातून पक्के ठरवले होते.गरिबांच्या मुलांना आय आय टी मध्ये शिकण्याची संधी मिळालीच पाहिजे.त्यासाठी त्याने 30 विद्यार्थ्यांची मोफत बॅच घ्यायचे ठरवले.कारण जास्त विद्यार्थ्यांचा खर्च झेपणारा पण नव्हता.या होतकरू विद्यार्थ्यांची परीक्षा घेवून निवड करायची ठरले.गावोगाव जाहिरात पोहोचली.या परीक्षेसाठी खेड्यापाड्यातून अनेक विद्यार्थी आले.केवळ ३० विद्यार्थी निवडले गेले.अतिशय कठीण परिस्थितीतून ही मुले आली होती.या सर्वाना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती.अशा स्थितीत ही मुले पाटण्यात राहून कशी शिकणार? यांच्याकडे फक्त जिद्द हेच भांडवल होते. या ३० विद्यार्थ्यांची राहणे,खाणे,झोपणे ही सर्व सोय आपल्या घराशेजारी एक मोठी रूम भाड्याने घेवून तिलाच बोर्डिंगचे रूप दिले.आनंद्कुमारची आई स्वतःच स्वयंपाक करून मुलामुलींना जेवू घालायची.कठीण परिस्थिती हे बलस्थान समजून आनंद कुमारने सुपर 30 चा अध्याय लिहायला सुरुवात केला.या विद्यार्थ्याना १००% आय आय टी ला प्रवेश मिळवून द्यायचाच. गुरूने निश्चय केला; पण विद्यार्थ्यांचे काय? आनंद णे या विद्यार्थ्यांना मानसिक दृष्ट्या मजबूत केले.तुमच्याकडे गमावण्यासाठी काही नाही पण तुम्ही ठरविले तर नक्कीच काही कमावू शकता.हा आत्मविश्वास त्यांच्या मनात प्रबळ केला.बोर्डिंग म्हणजे 24 तास अभ्यासाची प्रयोगशाळाच झाली.शिकविण्याची आगळी वेगळी पद्धती आणि आव्हान देणे यामुळे सर्व विद्यार्थी मन लावून शिकू लागली.शिकण्यातील आव्हाने पेलू लागली.शिकणे आव्हानात्मक झाले.त्यामुळे समजून शिकणे होवू लागले.बघता-बघता परीक्षा झाली.सर्वांचे डोळे निकालाकडे लागले.आणि काय आश्चर्य 30 पैकी २७ विद्यार्थी आय आय टी ला लागले!बाकीच्या तिघांना चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला. हा सिलसिला सुरूच राहिला.दुसर्या वर्षी २८,तिसऱ्या 30. अशा पद्धतीने विद्यार्थी आय आय टी प्रवेश करू लागले.आणि अशक़ पद्धतीने हा सुपर 30 चा गवगवा देशात नव्हे तर जगात पसरला.३०० पेक्षा जास्त विद्यार्थी आय आय टी मध्ये प्रवेश घेवून जगात नामांकित कंपन्यांत काम करीत आहेत. हजोरो विद्यार्थी चांगल्या अभियांत्रिकी महविद्यालयात शिकून कामावर रुजू झाले आहेत.केवळ गरिबी हे शिक्षण घेण्यात अडसर ठरत नाही हे आनंद कुमार व त्यांच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले.आनंद कुमारला सुप्रसिद्ध अशा केम्ब्रिज विद्यापीठात नमनाचा व्याख्याता म्हणून निमंत्रण आले. त्यवेळी त्याचा आनंद गगनात मावला नाही.एक 49 वर्षांचा तरुण आज जगातील चौथ्या क्रमांकाची गणित शाळा चालवतोय हि अभिमानाची बाब नव्हे तर काय!

        HATS OFF TO YOU BHAVA !    




इतर माहितीपूर्ण ब्लॉगला नक्कीच भेट द्या!  

                

  •    १६००० लोकांनी पाहिलेला आमचा खो-खो खेळाशी संबंधित ब्लॉग पहायचा असेल तर येथे स्पर्श करा.Kho-Kho sport  Kho-Kho sport

Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस