Skip to main content

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

अध्ययन निष्पत्ती

अध्ययन निष्पत्ती
Post on Date ०६/०१/२०१७

मिञांनो, ३री व ४थी या इयत्तेसाठी मराठी विषयाअंतर्गत *"प्रतिसादात्मक बोलणे"* हा उपक्रम राबविला असता विध्यार्थांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. उपक्रमाचा मुख्य हेतू *चर्चेत सहभागी होणे व आपले स्वत:चे मत विशद करणे/ मांडणे* हा होता.

*आई आपल्यासाठी काय काय करते?* हा विषय गटात चर्चेसाठी  दिला व मुलांना गटात प्रथम चर्चा करण्यास सांगितले व नंतर प्रत्येक विध्यार्थांना आईविषयी एक-एक वाक्य फलकावर स्वत:च्या शब्दात लिहिण्यास सांगितले असता मुलांनी सुंदर हस्ताक्षरात आईविषयी खुप चांगली वाक्यरचना तयार केली.

मिञांनो,बरेचसे परिचित विषय गटात चर्चेसाठी ठेवू शकतो. जसे ~मी पाहिलेली जञा,  माझी सुंदर शाळा, माझे आवडते शिक्षक, आवडता खेळ आदि.

अध्ययन निष्पत्ती~(०१) स्वत:चे शब्द स्वत:च्या शब्दात विशद केल्याचा आनंद होणे. (०२) प्रमाण भाषा व बोलीभाषा यातील फरकाची जाणीव होणे. (०३) भाषेच्या माध्यमातून विचारांचा विकास होणे. (०४) प्रसंगानुरूत, व्यक्तिनुसार  योग्य प्रकारे संवाद साधता येणे. (०५) आपले विचार, भावना, कल्पना व अनुभव व्यक्त करता येणे. (०६) लेखनातून आपले विचार व भावना व्यक्त करण्याची आवड निर्माण होणे. (०७) ज्ञान व आनंद(मनोरंजन) यासाठी अवांतर वाचनाची आवड निर्माण होणे. (०८) इतरांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकता येणे व सुसंगतपणे लक्षात ठेवणे. (०९) गटात सहकार्याची भावना व चुकांचे निरसन.

उपक्रमाची उद्दिष्टे~(०१) अध्ययन प्रक्रिया बालकेंद्रित, आनंददायी व रंजक करणे. (०२) आनंददायी व कृतियुक्त अध्ययनाद्वारे पोषक वातावरण निर्माण करणे. (०३) विध्यार्थांची अध्ययन पातळी सातत्याने उंचावत ठेवणे. (०४) विध्यार्थांमध्ये स्वयंअध्ययनाची सवय वाढविणे. (५) सातत्याने प्रत्येक टप्प्यावर मूल्यमापन करणे. (०६) विध्यार्थांनी अपेक्षित क्षमता संपादन केल्या आहेत याची खाञी करणे. (०७) कृती पूर्ण करताना होणार्या चुका, आढळलेल्या उणिवा व पूरक मार्गदर्शन आदि संबंधाने चर्चा करणे. (१०) विध्यार्थांनी स्वत:  ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करणे. (११) विध्यार्थांचा सहभाग वाढीस प्रेरणा देणे. (१२) विध्यार्थामध्ये आत्मविश्वास वाढीस प्रोत्साहन देणे.

Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस