क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे. तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...
*🕸🕸 सापळा* 🕸🕸 *लेखक अण्णाभाऊ साठे* *'लेका म्हारांनी पायरी सोडली,त्येस्नी आता गावचा* *इंगा दाखवू या,नायतर महार* *जात डोक्यावर बसल.* अस सांगत दादा देशमुख आळीपाळीने फिरला'. त्यानं महारांविरुध्द आग पेटवली आणि एकदम भडका उडाला.उभा गाव पिसाळला. महारांवर इंगा फिरवण्याची भाषा जो तो बोलू लागला.महार वाड्यावरुन गाढवाचा नांगर फिरवून तरच नावाचा दादा देशमुख! अशी दादाने डिरकी टाकली.एकून एक लहान थोर चावडीवर जमले.महाराना घेवून येण्यासाठी बज्या रामोशी दांडालला गेला. आणि *महार चावडीवर आले की त्यांना झोडपूनच काढायचे असा विचार करित गाव चावडीवर बसला.* कारण दादादेशमुखाचा वाड्यात मरनकळाच पसरली होती.आज दोन दिवस झाले देशमुखाचा प्रचंड बैल मरून दावनित पडला होता. तो लोखंडा प्रमाने ताठला होता.आणि भोपळ्या प्रमाणे फुगून डोळे वटारून पडला होता. भुंग्यासारख्या मोठाल्या माशांनी त्या बैलावर झाकण घातलं होतं. तो मेलेला बैल पाहून देशमुखाची बायका पोरं हवालदिल झाली होती.भयभीत झाली होती. दादा रडकुंडीला आला होता.*आपला बैल मेला या दुःखा ऐ...