क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे. तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...
*🤎 माहितीआदानप्रदान 🤎* माहिती कोणी एडिट केली माहीत नाही परंतु त्यांचे खुप खुप आभार *आभार.🙏* 1. शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकार कोणते ? एकंदरीत निवृत्तीवेतनाचे आठ प्रकार आहेत. नियत वयोमान निवृत्तीवेतन, पूर्णसेवा निवृत्तीवेतन, रुग्णता निवृत्तीवेतन, भरपाई निवृत्तीवेतन, जखम किंवा इजा निवृत्तीवेतन, अनुकंपा निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, असाधारण कुटुंब निवृत्तीवेतन असे हे प्रकार आहेत. नियत वयोमानानुसार म्हणजे वयाची 58 वर्ष पुर्ण झाल्यावर व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वयाची 60 वर्ष पुर्ण झाल्यावर कर्मचारी निवृत्त होतो. स्वेच्छा निवृत्ती, रूग्णता आणि भरपाई हेही निवृत्तीचे प्रकार आहेत. अकार्यक्षमतेमुळे देण्यात येणारी निवृत्ती म्हणजे अनुकंपा निवृत्ती होय. निवृत्ती वेतन घेणारा जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याच्या कुटूंबियांना मिळते ते कुटूंब निवृत्ती वेतन. एखादा सरकारी कर्मचारी हरवल्यास त्याच्या कुटूंबियांना त्रास होवू नये म्हणून असाधारण कुटूंब निवृत्ती दिल्या जाते. 2. निवृत्ती वेतन कोणाला देय आहे ? सेवानिवृत्ती वेतनासाठी कमीत कमी 10 वर्ष कालावधी हिशेबात घेत...