क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे. तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...
. 🚩शहाजी राजे भोसले यांचा आज जन्मदिवस 🚩 . शहाजी राजांचा जन्म 18 मार्च 1599 रोजी मालोजीराजे व दिपाबाई ऊर्फ ऊमाबाईसाहेब यांच्या पोटी झाला मालोजी व विठोजी हे दोन भोसले बंधू प्रथमतःफलटणच्या वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांच्या बरोबर राहात होते .मालोजीराजे यांच्या पराक्रमामुळे वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांनी आपली मुलगी दिपाबाई मालोजीराजे यांना दिली होती.नंतर त्यांचे नाव ऊमाबाई ठेवण्यात आले. त्यांना दोन मुले एक शहाजी व दुसरे शरीफजी मालोजीराजे यांच्या अकाली मृत्यूनंतर शहाजीराजे वयाच्या पाचव्या वर्षीच निजामशाहीचे जहागिरदार झाले. शहाजीराजे अत्यंत देखणे व तेजस्वी होते. त्यांची कीर्ती ही निजामशाही आणि आदिलशाहीत कदाचित इतर कुळातील सरदारापेक्षा अधिक प्रस्तुत झालेली होती. शहाजी राजांच्या आई उमाबाई या एक धाडसी , दूरदृष्टी असलेल्या महिला होत्या .आणि त्यांच्या देखरेखीखाली शहाजीराजे घडले होते व वाढलेही होते .बालपणापासूनच राजकारण-समाजकारण त्यांना जवळून पाहता आले .त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला युद्धशास्त्र निपुणतेचे उच...