Skip to main content

Posts

Showing posts from September, 2018

Featured Post

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ   मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे.     तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...

प्लेटलेट्स

प्लेटलेट्स म्हणजे काय? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल. हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात. या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे. या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे. *रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात.** लालपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी) आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते. प्लेटलेट्स या मोठया हाडांतील रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात. त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात. ⚡ *प्लेटलेट्सचं कार्य*⚡ रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वा...

ध्वनी

(सा . विज्ञान )            🔹ध्वनी: *'ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना'.* *ध्वनीचे स्वरूप :'ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते'*. *ध्वनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते*. *प्रत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.* *कंपन : वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय*. *उदा. *तंतुवाद्यातील तारेची कंपने* ध्वनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.* *वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.* *ध्वनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते* *ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही* *प्रत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्‍यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.* *ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये* : *जेव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.* *संपीडने : कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संप...

कावीळ आणि घरगुती उपाय

*काविळ आणि घरगुती उपाय - [Jaundice]*. काविळ झालेल्या लहान मुलांना काळ्या मनुक्याचं पाणी आणि प्रौढ व्यक्तींना पाण्यात भिजवलेले काळे मनुके खाण्यास द्यावेत. काविळ झाली आहे त्याला सर्वच पिवळं दिसतं असं आपण अनेकांना उपहासाने म्हणतो. मात्र या उक्तीचा काहिसा संबंध काविळ या आजारातील लक्षणांमध्ये दडलेला आहे. काविळीला कामला या नावानेही ओळखले जाते. मूळ संस्कृत कामला शब्दाचा अर्थ सर्व इच्छा नाहिसा करणारा आजार असा आहे. पावसाळा सुरू झाल्यावर किंवा पावसाळा संपल्यानंतर काविळीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. काविळ आणि काविळीवरील उपचारांबाबत अनेक समज-गैरसमज असले तरी दूषित पाण्यामुळे तसेच दूषित अन्न सेवनामुळे काविळ होते. काविळ होऊ नये याबाबत प्रतिबंधात्मक उपाय, आहार-विहाराबाबत तसेच काविळ झाल्यानंतर करावयाच्या उपचाराबाबत आयुर्वेदात खूप सोपे आणि चांगले उपाय सांगितले आहेत. मुळात यकृतातील पेशींना इजा झाल्यानं त्यांना सूज येते आणि यकृताच्या कार्यात अडचणी निर्माण होतात. परिणामी रक्तातील पित्तयुक्त द्रव्याचे प्रमाण वाढते. हे वाढलेलं पित्तयुक्त द्रव्य डोळ्यांतील बुबुळ वगळता असलेला पाढंरा भाग, त्वचा तसेच ह...

अपंगत्वाची लक्षणे

▃▃▃▃▃▃▃▃▃▃▃▃▃▃▃▃▃▃▃ मतिमंदता ( भाग -२ ) दिव्यांग मुले  बाल्यावस्थे मध्ये दिसून येऊ शकतो. *लक्षण दिसण्यास सुरू होण्याचा वेळ अक्षमतेच्या संशयास्पद कारणावर अवलंबून असतो.* *काही सौम्य मतिमंदतेचे निदान मूल शाळेत जाण्या पर्यंत होत नाही.* *ही मुले साधारणपणे सामाजिक, संवाद, आणि कार्यात्मिक सिद्धांत विषयक क्षमतेत कमी पडतात.* *मेंदूसंबंधी (न्यूरोलोजिक) अव्यवस्था उदा. मस्तिष्ककोप (एनसिफेलाइटीज) किंवा मस्तिष्क ज्वर (मेनिंजाइटीज) असणा-या मुलांमध्ये अचानक संज्ञानात्मक दुर्बलता आणि अनुकूलक अडचणीची लक्षणे दिसून येऊ शकतात.* मतिमंदतेचे विभाग *मतिमंदतेमध्ये सारासार विचारक्षमता मानसिक वयामध्ये मोजले जाते (बुद्ध्यांक किंवा आयक्यू). मतिमंदतेचे चार वेगळे वर्ग आहेत; सौम्य, मध्यम, गंभीर आणि अतिगंभीर. हे वर्ग मनुष्याच्या कार्यात्मक पातळीवर अवलबून आहेत.* सौम्य मतिमंदता *मतिमंदता असणा-या लोकांमध्ये सरासरी ८५ टक्के लोकांमध्ये सौम्य पद्धतीची मतिमंदता असते. त्यांचा आयक़्यू स्कोअर ७० ते ७५ पर्यंत असतो, आणि ते बहुदा सहावी इयत्ते पर्यंतचे सिद्धांत विषयक कुशलता प्राप्त करतात. ते पुरेसे आत्मनिर्भर ...

Popular posts from this blog