Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

डोळ्यांचे आरोग्य कसे राखावे?

*🍀🍀डोळे  व आरोग्य*🍀🍀 १. डोळे हे मनुष्याला मिळालेले मोठे वरदान आहे. देवाने दिलेल्या या सुंदर अवयवाची आवश्‍यक ती काळजी घेणे आपल्याच हातात आहे. आजकाल सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचा मेकप वेगळा केला जातो व त्यामुळे सौंदर्यात भरच पडते. हे सौंदर्य जसे बाहेरून वाढवले जाते तसेच आतून सुद्धा डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. *२. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये अन्नपदार्थातून मिळतात.* *३. केशरी, लाल, नारंगी, रंगाची फळे व भाज्या*:  जीवनसत्व ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे कार्य उत्तम व नियमितपणे करण्यासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. खूप पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहोत की गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्‍यक आहे. केवळ गाजरच नाही तर केशरी, लाल, नारंगी रंगाची फळे व भाज्या यांमध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येऊ शकतो. तसेच रेटीना व कॉर्निया सारख्या डोळ्यातील अतिमहत्वाच्या भागांनाही कमकुवतपणा येण्

श्यामच्या आईची जन्मशताब्दी

*कृपया आवर्जून भरपूर वेळ काढून शांत चित्ताने परत परत वाचावा असा सुरेख लेख! - डॉ. वसंत शेणाॅय* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏  *श्यामच्या आईचे आज काय करायचं?* *लेखक - श्री. हेरंब कुलकर्णी* *यशोदा सदाशिव साने* !  *मृत्यू: २ नोव्हेंबर १९१७*  " *श्यामची आई*" नावाच्या प्रसिद्ध आईची स्मृतीशताब्दी २ नोव्हेंबरला सुरू झाली. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृती शताब्दी महाराष्ट्र साजरी करतो आहे. ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती. एखाद्या मंत्र्यांची आई नव्हती किंवा एखाद्या राजघराण्यातली सुद्धा नव्हती.  कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष लक्षात ठेवावे. तिचा साधा फोटोही उपलब्ध नसताना तिला १०० वर्षे घरातल्या व्यक्तीसारखे पुजावे हे विलक्षण आहे. सानेगुरुजींची आई. कोकणातल्या एका खेड्यात जन्मली आणि तिथेच संपून गेलेली. इतर भारतीय स्त्रियांसारखी माजघराच्या चुलीच्या धूरात विझून गेलेली ही आई. नवरा, सासू , सासरे, मुले, आजारपण याच विश्वात राहणारी. तरी पण महाराष्ट्राच्या भावविश्वात तिचे स्थान काय म्हणून कायम आहे? वसंत बापट यांनी गुरुजींच्या एका नातेवा

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस