*(१) मगर* 🐊 मगर हा पाण्यात व जमिनीवर राहणारा उभयचर प्राणी आहे. तो सरपटणारा मांसभक्षक प्राणी आहे. त्याचा जबडा खूप शक्तिशाली असतो. तो उन्हात तोंड उघडे करून आराम करतो, तेव्हा पक्षी त्याच्या दातात अडकलेले मांस खातात. कधीकधी पक्षी त्याचे भक्ष बनतात. मगर स्वतःची जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही. ----------------------------------------------------- *(२) कासव* 🐢 कासव हा उभयचर प्राणी आहे. त्याच्या पाठीवर जाड व टणक कवच असते. धोक्याची चाहूल लागताच कासव स्वतःला कवचाच्या आतमध्ये लपवितो. तो जमिनीवर अतिशय हळूहळू चालतो, परंतु पाण्यात तो चपळ आहे. कासव हा शाकाहारी असून तो वनस्पती खातो. तो शीतरक्ताचा प्राणी आहे. कासव हा दीर्घायुष्यी आहे. त्याचा जीवनकाल १०० वर्षापेक्षा जास्त आहे. ----------------------------------------------------- *(३) मासा* 🐟 मासा हा जलचर प्राणी असून त्याच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. माश्याला पापण्या नसल्याने तो डोळे उघडे ठेवून झोपतो. त्याला नाक नसते.तो कल्ल्याच्या साहाय्याने पाण्यात
खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४ मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४ मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्