Skip to main content

Featured Post

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ   मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे.     तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ 





 मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे.

    तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्वक क्षमायाचना करतो.दुसरे म्हणजे या कोविड च्या जागतिक महामारीत आणखी पुन्हा उशीर !पण काही हरकत नाही ,उशीर झाला तरी क्वालीटी कोम्प्रोमाईज अजिबात केले नाही.तर ज्या 45 मान्यवरांनी आपले अतिशय उच्च कोटीचे निबंध पाठवून दिले व आपणासाठी एक दुर्मिळ ठेवा उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार!

    आता पाहू या या अनमोल ग्रंथाविषयी :

    आपणास क्रांतीगुरू लहूजी साळवे यांच्याबद्दल काय माहिती आहे?

    त्यांना क्रांतीगुरू का म्हणतात?

    त्यांचा आणि महात्मा फुले यांचा काही संबंध आहे का?

    महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या चळवळीशी काही संबंध आहे का?

    त्यांचे स्वातंत्र्य चळवळीत काही योगदान आहे का?

    भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यात त्यांचे योगदान काय व किती?

    त्यांनी खरेच लोकमान्य टिळकांना कुस्तीचे धडे दिले का/

    त्यांचे तालमीत तयार झालेले शिष्यगण कोण?

    ते आजन्म अविवाहित का राहिले?

    काय आहे त्यांची आजन्म ब्रम्हचारी राहण्याची शपथ?

    शिष्य आभाळाएवढे झाले पण का राहिला त्यांचा  गुरु दुर्लक्षित?

    त्यांचे घराणे छत्रपतींच्या दरबारात खरेच कोणत्या उंचीचे होते?

    पुणे परिसरातील चळवळी देशपातळीवर गाजल्या पण हा योद्धा का राहिला दुर्लक्षित?

    अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर हा संदर्भ ग्रंथ आपण नक्कीच वाचला पाहिजे.


या ग्रंथाची मुळ किंमत =350 रु

सवलतीत किंमत = 250 +50 (पोस्टेज खर्च )=300 रु.

आजच आपली कॉपी सुरक्षित करा.पुढील लिंक वर नोंदणी करा 

येथे क्लिक करा.

  👆👆👆


                        संपादक 

डॉ सुशीलप्रकाश चिमोरे            डॉ बालाजी समुखराव

 M A. B ED. PH D.                     MA. M ED. NET(शिक्षणशास्त्र) MA ENGLISH, SET NET MARATHI 

 मराठी विभाग प्रमुख                      PH D MARATHI                                             

९३५६७७१५५२;                            ९२८४३७६४९४

Comments

Popular posts from this blog

चंद्रयान 3 चंद्रावर पोहचले

डोळ्यांचे आरोग्य कसे राखावे?

*🍀🍀डोळे  व आरोग्य*🍀🍀 १. डोळे हे मनुष्याला मिळालेले मोठे वरदान आहे. देवाने दिलेल्या या सुंदर अवयवाची आवश्‍यक ती काळजी घेणे आपल्याच हातात आहे. आजकाल सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचा मेकप वेगळा केला जातो व त्यामुळे सौंदर्यात भरच पडते. हे सौंदर्य जसे बाहेरून वाढवले जाते तसेच आतून सुद्धा डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. *२. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये अन्नपदार्थातून मिळतात.* *३. केशरी, लाल, नारंगी, रंगाची फळे व भाज्या*:  जीवनसत्व ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे कार्य उत्तम व नियमितपणे करण्यासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. खूप पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहोत की गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्‍यक आहे. केवळ गाजरच नाही तर केशरी, लाल, नारंगी रंगाची फळे व भाज्या यांमध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येऊ शकतो. तसेच रेटीना व कॉर्निया सारख्या डोळ्यातील अतिमहत्वाच्या भागांनाही कमकुव...

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस