Skip to main content

Posts

Showing posts from November, 2018

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

ययाती कादंबरीचा परिचय

📕        📖 📖 *पुस्तक परिचय* ➡  🌹 *ययाती* 🌹 *ययाती......*  वि.स.खांडेकर  ✍🏻 या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबध नसून ही कादंबरी पौराणिक घटना एकत्र करुन स्वातंत्र्य रित्या मांडली आहे. पुराणकथा म्हणजे खुप काहि भव्य आणि भयंकर लढा हे जास्त आढळुन येते पण ह्या कांदबरी ठराविक घटना घेऊन जीवन हे एक क्षणाभंगूर तसेच दुस-या बाजूने ते चिरंतर, भौतिक व आत्मिक आहे हे सांगितले. बहुतांवशी आपण पुराणकथेत त्यांचे संर्घष व लढा पाहतो त्या लढाईसाठी केलेले डावपेज पाहतो परंतु ह्या कथेत एका राजाच्या जीवनातील खाचखळगे दाखविले आहे. त्याची मांडणी सहज व साध्या पद्धतीने आपल्यासमोर मांडली आहे. त्यांची शृंगारिक भाषाशैली ही खुप सुरेख आहे. कथा तशी छोटीच आहे पण त्यातील भाषाशैली व त्या काळात दृश्य आपल्यासमोर खुप व्यवस्थित रित्या मांडले आहे. ययाती ह्या कांदबरीची सुरवातच खुप छान केली आहे. " राजे राण्यांच्या गोष्टी लोक मोठ्या आवडीने ऎकतात त्यांच्या प्रेमकथात तर जगाला फार गोडी वाटते. मोठे कवी त्या कथांवर काव्ये रचतात" पण ही कहाणी एक प्रेम कथा छे ती ती कसली कथा आहे कोणाला ठाऊक ! एखाद्या कवीचे म

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

तांड्यावर तिरंगा फडकला

तांड्यावर तिरंगा फडकला ...!! “विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेली,नीतीविना गती गेली,गतीविना वित्त गेले,वित्ताविना शुद्र खचले,इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले.” हे महात्मा फुले यांचे सुवचन मानवी जीवनात विद्येचे अनन्यसाधारण महत्त्व विशद करणारे आहे.विद्या नसेल तर माणूस गुलाम बनतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी, “गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल” असे म्हटले आहे.मानवी जीवनात विद्येचे महत्त्व या दोन्ही महापुरुषांनी स्पष्ट केले आहे.शिक्षण नसेल तर मानवी प्रगतीत गतिरोध निर्माण होतो.शिक्षणापासून कोसो मैल दूर असलेल्या कर्नाटक सीमेलगत वसलेल्या देवणी तालुक्यातील विळेगावजवळील राम-लक्ष्मण तांड्यावर शिक्षणाची पहाट कशी उजाडली त्याची ही कथा...        दि.२७ नोव्हेंबर १९९९ हा दिवस राम-लक्ष्मण तांडा विळेगाव येथील रहिवाशांच्या जीवनात सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा असाच आहे.कारण याच दिवशी या तांड्यावर शिक्षणाची नवी पहाट उजाडली.डी.पी.ई.पी.अंतर्गत पहिल्यांदाच प्राथमिक शाळा सुरु झाली आणि वर्षानुवर्षे अंधारमय जीवन जगणाऱ्या तांडावासीयांच्या आयुष्यात शिक्षणाचा नवीन सूर्योदय झाला...!      त

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्