सुपर 30 आहे तरी काय ? नमस्कार मंडळी,आपणास माहित आहे का सुपर 30 आणि आनंदकुमार हे कोण आहेत? काय आहे सुपर 30 ?चला तर मग आपण पाहू या आपल्या मायबोलीत ... सुपर 30 ही कथा म्हणजे कादंबरीतील काल्पनिक परी-राक्षस यांची कथा नक्कीच नाही.तर टी आहे आनंदकुमार या बिहार मधील एका तरुणाची संघर्षगाथा! आनंदकुमारचे बालपण :- बिहार राज्यातील पाटणा या राजधानीच्या ठिकाणी चांदपूर बेला नावाची वस्ती आहे. या वस्तीत शान्तिकुटीर हे आनंद कुमारचे जन्मस्थान.त्याचा जन्म 1 जानेवारी १९७३ रोजी आई जयंतीदेवी व वडील राजेंद्र प्रसाद यांच्या पोटी झाला.म्हणजे आजपासून तब्बल ४८वर्षांपूर्वीचा बिहार किती मागासलेला असेल याची कल्पना आपणास येईल.७०% गरिबी, शिक्षणाचा अभाव अशा बिहारात आनंदकुमार याचा जन्म झाला.वडील राजेंद्र प्रसाद हे रेल्वे च्या मेल सेवेमध्ये पत्र छाननी करायचे.अतिशय तुटपुंजे वेतन.८बाय१० च्या खोलीत हे कुटुंब राहायचे.राजेंद्र प्रसाद सोबत त्यांचे लग्न झालेले भाऊ पण राहायचे.मोठे कुटुंब.आनंद कुमारचे शालेय शिक्षण सरकारी शाळेत झाले.आनंद शालेय जीवनात खूप धडपड्या स्वभावाचा होता. जिज्ञासू होता. सतत प्रयोग करा
खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४ मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४ मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्