Skip to main content

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

ययाती कादंबरीचा परिचय

📕        📖

📖 *पुस्तक परिचय*

➡  🌹 *ययाती* 🌹

*ययाती......*
 वि.स.खांडेकर  ✍🏻
या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबध नसून ही कादंबरी पौराणिक घटना एकत्र करुन स्वातंत्र्य रित्या मांडली आहे. पुराणकथा म्हणजे खुप काहि भव्य आणि भयंकर लढा हे जास्त आढळुन येते पण ह्या कांदबरी ठराविक घटना घेऊन जीवन हे एक क्षणाभंगूर तसेच दुस-या बाजूने ते चिरंतर, भौतिक व आत्मिक आहे हे सांगितले. बहुतांवशी आपण पुराणकथेत त्यांचे संर्घष व लढा पाहतो त्या लढाईसाठी केलेले डावपेज पाहतो परंतु ह्या कथेत एका राजाच्या जीवनातील खाचखळगे दाखविले आहे. त्याची मांडणी सहज व साध्या पद्धतीने आपल्यासमोर मांडली आहे. त्यांची शृंगारिक भाषाशैली ही खुप सुरेख आहे.

कथा तशी छोटीच आहे पण त्यातील भाषाशैली व त्या काळात दृश्य आपल्यासमोर खुप व्यवस्थित रित्या मांडले आहे.

ययाती ह्या कांदबरीची सुरवातच खुप छान केली आहे.
" राजे राण्यांच्या गोष्टी लोक मोठ्या आवडीने ऎकतात त्यांच्या प्रेमकथात तर जगाला फार गोडी वाटते. मोठे कवी त्या कथांवर काव्ये रचतात" पण ही कहाणी एक प्रेम कथा छे ती ती कसली कथा आहे कोणाला ठाऊक ! एखाद्या कवीचे मन वेधुन घेण्यासारखे काहि नाही...

ह्या कथेत मुख्य पात्र ही चार आहेत पण प्रत्येक पात्राला त्या व्यक्तीला तेवढेच महत्व आहे. जसे एखादी व्यक्ती नसती तर ह्या घटना घडल्याच नसत्या. प्रत्येक व्यक्ती त्या त्या घटनेला तेवढाछ कारणीभूत आहे. ह्या कथेत ययाती, देवयानी, शर्मिष्ठा व कच हे मुख्य पात्र आहेत.
*ययाती* :-
हा लहाणपणापासुन स्वप्नात रमणारा, सौदर्यांचा वेडा, फुलांचा व त्याचा गंधाचा त्याला हव्यास होता. कोणी फुल आणुन दिली की तो त्यांचा सुगंध पोटभरुन घ्यायचा. तो शुर होताच पण त्याही पेक्षा कामुक, लंपट ज्याला स्वप्नातही संयम ठेवता येत नाही असा होता. त्याला प्रेम पाहिजे असते पण ते नेमके कसे तेच त्याला कळत नाही आणि त्याच्या शोधात तो पुर्ण आयुष्य घालवतो त्याला कधीही वृध्द बनायचे नसते सदैव चिरतरूण राहु इच्छितो, परंतु काहि घटनांमुळे त्याला आयुष्याच्या अंती जाणवत की ही सारी भोगवृत्ती जीवनासाठी उपयुक्त नसते.

*देवयानी* :-
देवयानी ही एक ॠषीकन्या. अहंकारी, महत्वाकांक्षी, तिचे खरे प्रेम कच वर असते पण कचला फक्त त्याचे कार्य महत्वाचे वाटते व तो तिला नाकारतो त्या प्रेमभंगातच ती ययातीचा स्वीकार करते पण त्यातही असफलच ठरते कारण ती अहंकारामुळे ययातीची सखी बनु शकली नाही, ययातीच्या लंपट स्वभावाला हीच कारणीभुत ठरते कारण जे सौख्य ययातीला पाहिजे असते ते ती देण्यास प्रत्येक वेळी नकारते तीही त्याचा द्वेष करत राहते.अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी;

*शर्मिष्ठा* :-
शर्मिष्ठा ही खरी राजकन्या परंतु देवयानीच्या अहंकारामुळे व काही घटनेमुळे शर्मिष्ठाला देवयानीची दासी म्हणुन राहावे लागते. त्याच दरम्यान शर्मिष्ठा व ययाती ह्यामध्ये सख्य होते. ययातीला ज्या प्रेमाची गरज असते तेच प्रेम शर्मिष्ठा कडुन मिळते. परंतू जेव्हा देवयानीला ते कळते तेव्हा ती तिचा वध करु इच्छिते पण ययाती तिला वाचवुन सगळ्या पासुन दुर जाण्यास सांगतो. स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा

*कच* :-
कच हा देवांचे गुरू बृहस्पतीचा पुत्र होय. दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांनी संजीवनीविद्येच्या बळावर दैत्यराजा वृषपर्वा यास देवांचा युद्धामध्ये वारंवार पराभव करण्यास सहाय्य केले. देवांचा राजा इंद्र याने कचास शुक्राचार्यांचा शिष्य होऊन त्यांच्याकडून संजीवनीविद्या शिकून घेण्याच्या कामगिरीवर पाठवले. एका अलौकीक घटनाक्रमामुळे देवयानी हिच्या आग्रहामुळे शुक्राचार्यांना कचास संजीवनीविद्या शिकवणे भाग पडले त्यामुळे देवतांचा विजय होतो. विचारी, संयमी व ध्येयवादी असा कच
या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत.

*'ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे,*  हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,' अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.

मला आवडलेले उतारे:-

🌹जग चुकते, त्या चुकीविषयी ऎकते, पण शिकत मात्र नाही ! प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुस-याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वत:ला झालेल्या जखमांनी...

🌹मागे किर्र रान, पुढे गर्द अरण्य, असे आहे हे जीवन ! अज्ञाताच्या अंधकारात तर ते अधिकच भयाण भसते. कुठल्या तरी चांदण्याचा मिणमिणणारा प्रकाश अधुन मधुन या अरण्याला पाऊलवाटे पर्यंत येऊन पोचतो. या पायवाटेवरुन होण-या माणसाच्या प्रवासाला आपण जीवन म्हणतो.

🌹शब्दापेक्षा स्पर्श अधिक बोलका असतो. पण त्याला काहि माणसाच्या काळजाला हात घालता येत नाहि. ते काम अश्रुंनाच साधते.

🌹अनेक वर्षापूर्वी नाहिशा झालेल्या मुलाच्या आठवणीने आपली आई अजुन व्याकुळ होते. पण तीच आई पाखरातल्या एका आईचा मृत्यू हसत्मुखाने पाहते त्या मुक्या मातेचे मांस चवीने खाते. त्या मांसाचा कण नि कण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या पिलांकरता धडपडत होता हे सहज विसरते. जीवनातल्या या विचित्र विरोधाने --------- किती विचित्र विरोधाभास आहे.

🌹आयुष्याच्या आरंभी ज्यात काहि अर्थ नाहि, असे वाटते, त्यातच खोल अर्थ भरलेला आहे, असे आयुष्यांच्या शेवटी आढळून येते.

Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस