Skip to main content

Featured Post

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ   मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे.     तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...

प्राणी माहिती

               *(१) मगर* 🐊

       मगर हा पाण्यात व जमिनीवर राहणारा
उभयचर प्राणी आहे. तो सरपटणारा मांसभक्षक
प्राणी आहे. त्याचा जबडा खूप शक्तिशाली
असतो. तो उन्हात तोंड उघडे करून आराम
करतो, तेव्हा  पक्षी त्याच्या दातात अडकलेले
मांस खातात. कधीकधी पक्षी त्याचे भक्ष बनतात.
मगर स्वतःची जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत
नाही.
-----------------------------------------------------
              *(२) कासव* 🐢

       कासव हा उभयचर प्राणी आहे.
त्याच्या पाठीवर जाड व टणक कवच असते.
धोक्याची चाहूल लागताच कासव स्वतःला
कवचाच्या आतमध्ये लपवितो. तो जमिनीवर
अतिशय हळूहळू चालतो, परंतु पाण्यात तो
चपळ आहे. कासव हा शाकाहारी असून तो
वनस्पती खातो. तो शीतरक्ताचा प्राणी आहे.
कासव हा दीर्घायुष्यी आहे. त्याचा जीवनकाल
१०० वर्षापेक्षा जास्त आहे.
-----------------------------------------------------
               *(३) मासा* 🐟

       मासा हा जलचर प्राणी असून त्याच्या
 वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. माश्याला
पापण्या नसल्याने तो डोळे उघडे ठेवून झोपतो.
त्याला नाक नसते.तो कल्ल्याच्या साहाय्याने
पाण्यात आॅक्सिजन ग्रहण करतो. काही
माश्यांच्या शरीरावर खवले असतात. मासे
पाण्यातशेवाळ व इतर वनस्पती खाऊन आपले
पोट भरतात तर मोठमोठे मासे इतर जीवांना
व लहान मास्यांना खाऊन आपले पोट भरत असतात.
-----------------------------------------------------
              *(४) खेकडा* 🦀

     खेकडा हा उभयचर प्राणी आहे. जगामध्ये
खेकड्याच्या ४००० पेक्षा जास्त जाती आहेत.
या प्राण्याला कणा नसतो, त्याला मान आणि
डोकेही नसते. त्याला ८ पाय व संरक्षणासाठी
दोन नांग्या असतात. खेकड्याच्या नांग्या तुटल्या
तरी त्या काही काळाने पुन्हा उगवतात. त्याच्या
पाठीवर कठीण आवरण असते.
-----------------------------------------------------
              *(५) बेडूक* 🐸

    बेडूक हा पृष्ठवंशिय उभयचर व शीतरक्ताचा
प्राणी आहे. त्याची त्वचा पाणी ग्रहण करते
म्हणून त्याला पाणी पिण्याची गरज भासत
नाही. बेडूक हा त्वचेद्वारे श्वसन करतो. अतिशय
थंडहवामानातबेडूक स्वतःला जमिनीवर गाडून
घेतात व दीर्घ निद्रा घेतात. बेडूक हा मांसाहारी
असतो. नर बेडकाचा आवाज घोगरा, खोल

Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्...

स्वच्छ गाव माझा गाव