Skip to main content

Featured Post

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ   मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे.     तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...

क्रांतिगुरू लहुजी साळवे

क्रांतिगुरू लहुजी राघोजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. ते लहुजी वस्ताद नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका मातंग कुटुंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहूजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराकर्मी पुरुष होते, युद्ध कलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरत नसे. त वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे त्याकाळी प्रसिद्ध होते. एखदा राघोजी साळवे यांनी वाघाबरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या राजदरबारी सादर केले होते व आपल्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. साळवे घराने सशस्त्र विद्येमध्ये निपुण व तरबेज होते त्यामुळे, शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात साळवे घराण्याची योग्यता ओळखून पुरंदरकिल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांचे आजोबा यांच्याकडे सोपवली होती. पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणासाठी साळवे घराण्यातील अनेक वीर पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना 'राऊत ' या पदवीने गौरविले होते.

पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व २३ वर्षे वयाच्या लहुजी यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. लहुजीं चे वडील राघोजी साळवे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे शत्रू वर तुटून पडले होते व सपासप तलवारीचे वार करत शत्रुंना जमिनीवर लोळवत होते. अखेर या संकटातुन बाहेर पडण्यासाठी घाबरलेल्या इंग्रजांनी एकत्र वार करून राघोजींना संपवले.

राघोजी या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. पुढे इ.स. १८१८मध्ये मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज शनिवारवाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.

या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले. आपल्या वडिलांना आपल्या डोळ्या समोरच शहीद झालेले पाहून लहूजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली व भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली. ही समाधी अजूनही पुणे-शिवाजीनगरजवळच्या ‘वाकडेवाडी’ येथे आहे.

दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्ध कले मध्ये लहुजी निपुण होते लहुजींचे पिळदार शरीर व त्यांची भरलेली छाती पाहून शत्रूला सुद्धा घाम फुटत असे. जीवघेण्या शस्त्रां बरोबर ते अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असतं. आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.

२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे

इ.स. १८४८ साली लहुजींच्या तालमीत सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भरत होती.

क्रांतीची प्रथम सुरुवात करणारे.. 
भारतीय स्वातंत्र्याचे आदय जनक.. 
असंख्य क्रांतीवीरांचे गूरुवर्य.. 
शिक्षणाचा प्रथम पाया रचणारे.. 
आदय क्रांतीपिता गुरूवर्य क्रांतीसूर्य #लहूजी_वस्ताद_साळवे यांच्या २२६ व्या जयंती निमित्त #स्वतंत्र_भारत देशातील तमाम जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा... 🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्...

स्वच्छ गाव माझा गाव