क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे. तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...
यशोदीप पब्लिकेशन पुणे घेऊन येत आहे क्रांतिगुरु लहुजी साळवे या महाग्रंथाची अल्पावधीतच दुसरी आवृत्ती...
'क्रांतीगुरू लहुजी साळवे' या संपादीत ग्रंथाची दुसरी आवृत्ती १४ नोव्हेंबर २०२२ रोजी क्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त यशोदीप पब्लिकेशन्स पुणे यांनी प्रकाशित केली आहे.आपणास ग्रंथ हवे असेल तर नोंदणी करा.पृष्ठ संख्या २७५असू ग्रंथांचे मूल्य ४५० रूपये आहे. ग्रंथ हवे असल्यास ४००रूपये ९९२२९६६५२६ या नंबरवर फोन पे करावे ही विनंती
Comments
Post a Comment