Skip to main content

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

अण्णा भाऊ साठे यांचे तत्त्वज्ञान

*बहुजन चळवळीचे महानायक*: *अण्णा भाऊ साठे*                           अण्णा भाऊ साठे हे नाव आता उभ्या  महाराष्ट्राला सुपरिचित झाले आहे .1 ऑगस्ट1920 रोजी वाटेगाव ता. वाळवा जि.सांगली येथे वालुआई आणि भाऊराव साठे या दांपत्याच्या पोटी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. खरेतर जन्म कोठे घ्यावा हे कोणत्याही व्यक्तीच्या हाती नसते. पणआयुष्य कसे जगायचे हे मात्र त्या व्यक्तीच्या हाती असते. अण्णा भाऊंचा जन्म हा अठराविश्वे दारिद्र्य पाचवीला पुजलेल्या मातंग या दलित जातीत झाला. जात ही भारतीय समाज व्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण आहे . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती या अराष्ट्रीय आहेत असे भाष्य केलेले आहे. तरीही जातीचे वलय व्यक्ती पासून तुटत नाही. जात हा वेगळा विषय असला तरी अण्णा भाऊंचे मूल्यांकन करताना जातीच्या परिप्रेक्षातून त्यांच्याकडे पाहिले जाते. ही बाब तशी कोणत्याही व्यक्तीला समजून घेताना अडसर ठरणारी किंवा त्या व्यक्तिमत्त्वावर अन्याय करणारी ठरू शकते. तेव्हा जातीच्या पलीकडे जाऊन अण्णा भाऊंना समजून घ्यावे लागेल. एक बाब या अनुषंगाने नमूद करता येईल ती म्हणजे व्यक्ती समजून घेताना तिचा विचार, जीवनविषयक दृष्टिकोन या बाबी महत्त्वपूर्ण असताना दैनंदिन जगण्यावरून त्या व्यक्तीचे परीक्षण केले जाते.व्यक्तीचे जगणे हे व्यवस्थेने बंदिस्त केले गेलेले असते. तशी ती व्यक्ती संघर्षरतअसतेच पण पुन्हा ती कुठल्या विचारात जगते ते महत्त्वाचे ठरते. तेव्हा अण्णा भाऊला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असेल तर त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान समजून घ्यावे लागेल. न  की त्यांचे व्यवस्थेने लादलेले जिणे.
     अण्णाभाऊ म्हणतात की , "मला माणसे फार आवडतात.ती जगतातआणि इतरांना जगवतात. साहित्यातून त्यांना विकृत करणे मला आवडत नाही."  ही त्यांची लोकनिष्ठा  त्यांच्या साहित्याचे अधिष्ठान आहे.  ही त्यांची निस्सीम लोकभक्ती आहे. प्राचार्य म.भी. चिटणीस म्हणतात,"भारतीय समाजाला नीतिमान बनवणे हे दलित साहित्याचे प्रयोजन आहे. तसेच दलित चळवळ ही पतितोद्धाराची चळवळ नसून राष्ट्रोद्धाराची  चळवळ आहे", असा विचार मांडला होता. त्या अर्थाने विचार केला असता अण्णा भाऊंचे साहित्य हे  राष्ट्र उद्धारासाठी पोषकच ठरणारे आहे . अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून नीतीसंपन्न पात्रे उभी केली. स्त्रीचे शील जपले.स्त्रीला विकृत केले नाही .पोटात भुकेचा आगडोंब असला तरीही ही माणसे आपला आचारधर्म सोडत नाहीत. नीतीचे वर्तन त्यांच्याकडून घडते. कठीण प्रसंगीही नायक - नायिका त्यांचा नीतिधर्म सोडत नाहीत. ही अण्णा भाऊ साठे यांची लोकभक्ती होय.ही पात्रे काल्पनिक नाहीत,तर  त्यांच्या अवतीभवती वावरणारी जिवंत माणसे आहेत.त्यांचा जीवनसंघर्ष अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून साकारला .त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले. मुका दलित त्यांच्या साहित्यातून बोलका झाला.तो 'स्व'त्व शोधू लागला. त्यांच्यात  आत्मभान पेरण्याचे काम अण्णाभाऊ साठेनी केले. त्यांचे समग्र लेखन समाजलक्षी  आणि लोककेंद्री होते. साहित्यातून त्यांना सम्यक परिवर्तन घडलेला समाज उभा करायचा होता. लेखणीतून मानवी जीवनात व्यापक परिवर्तन घडते  यावर त्यांचा ठाम विश्वास होता. हे जग बदलू शकते असा प्रचंड आत्मविश्वास त्यांच्या ठायी होता. त्यामुळेच 'फकीरा' या त्यांच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतीला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आहे. मानवाला त्याच्या बाहय जीवनाच्या परिस्थितीतूनच वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणे,त्याला कमीपणा आणणाऱ्या वास्तव जगाच्या  बंधनातून मुक्त करणे आणि तु गुलाम नाहीस वास्तव जगाचा धनी आहेस ,तू जीवनाचा स्वतंत्र निर्माता आहेस .असा साक्षात्कार त्यांना साहित्यातून घडवायचा होता. किंबहुना हेच त्यांच्या साहित्याचे विशेष होय.या परिवर्तनवादी महानायकला कोटी कोटी प्रणाम!
      डॉ बालाजी समुखराव,
       एल आय सी कॉलनी,लातूर
        मो.९२८४३७६४९४.

Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस