Skip to main content

Posts

Showing posts from 2019

Featured Post

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ   मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे.     तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...
*🕸🕸 सापळा* 🕸🕸 *लेखक अण्णाभाऊ साठे* *'लेका म्हारांनी पायरी सोडली,त्येस्नी आता गावचा* *इंगा दाखवू या,नायतर महार* *जात डोक्यावर बसल.* अस सांगत दादा देशमुख आळीपाळीने फिरला'.         त्यानं महारांविरुध्द आग पेटवली आणि एकदम भडका उडाला.उभा गाव पिसाळला. महारांवर इंगा फिरवण्याची भाषा जो तो बोलू लागला.महार वाड्यावरुन गाढवाचा नांगर फिरवून तरच नावाचा दादा देशमुख! अशी दादाने डिरकी टाकली.एकून एक लहान थोर चावडीवर जमले.महाराना घेवून येण्यासाठी बज्या रामोशी दांडालला गेला. आणि *महार चावडीवर आले की त्यांना झोडपूनच काढायचे असा विचार करित गाव चावडीवर बसला.*                कारण दादादेशमुखाचा वाड्यात मरनकळाच पसरली होती.आज दोन दिवस झाले देशमुखाचा प्रचंड बैल मरून दावनित पडला होता. तो लोखंडा प्रमाने ताठला होता.आणि भोपळ्या प्रमाणे फुगून डोळे वटारून पडला होता. भुंग्यासारख्या मोठाल्या माशांनी त्या बैलावर झाकण घातलं होतं. तो मेलेला बैल पाहून देशमुखाची बायका पोरं हवालदिल झाली होती.भयभीत झाली होती. दादा रडकुंडीला आला होता.*आपला बैल मेला या दुःखा ऐ...

प्राणी माहिती

               *(१) मगर* 🐊        मगर हा पाण्यात व जमिनीवर राहणारा उभयचर प्राणी आहे. तो सरपटणारा मांसभक्षक प्राणी आहे. त्याचा जबडा खूप शक्तिशाली असतो. तो उन्हात तोंड उघडे करून आराम करतो, तेव्हा  पक्षी त्याच्या दातात अडकलेले मांस खातात. कधीकधी पक्षी त्याचे भक्ष बनतात. मगर स्वतःची जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही. -----------------------------------------------------               *(२) कासव* 🐢        कासव हा उभयचर प्राणी आहे. त्याच्या पाठीवर जाड व टणक कवच असते. धोक्याची चाहूल लागताच कासव स्वतःला कवचाच्या आतमध्ये लपवितो. तो जमिनीवर अतिशय हळूहळू चालतो, परंतु पाण्यात तो चपळ आहे. कासव हा शाकाहारी असून तो वनस्पती खातो. तो शीतरक्ताचा प्राणी आहे. कासव हा दीर्घायुष्यी आहे. त्याचा जीवनकाल १०० वर्षापेक्षा जास्त आहे. -----------------------------------------------------                *(३) मासा* 🐟     ...

सावित्रीबाई फुले

।। युग स्त्री-सावित्रीबाई ज्योतिबा फुले ।। परदेशातून भारतात आलेल्या आर्यांनी परमेश्वराच्या नावाने चार वर्णाची निर्मिती करुन मूळ रहिवाशी भारतीयांना शुद्र वर्णात टाकले. ह्या शुद्रांना (आजचा बहुजन समाज ) ६००० जातीमध्ये विभागून त्यांच्यात उच्चनीचतेची विषारी भावना रुजविली. बहुजन समाजाला दैववादी व अंधश्रध्दाळू बनवीले व आपल्या भजनी लावले. काल्पनिक देवधर्माच्या, स्वर्ग-नरकाच्या व पाप-पुण्याच्या मोहजालात गुरफटवून मानसिक व शारिरीक गुलामगिरीत बहुजानांना बंदिस्त करुन ठेवले. हा प्रकार गेली पांच हजार वर्षापासून या देशात चालत आलेला आहे. अशा मनुवादी जाचक व अनिष्ठ रुढी परंपरेवर म. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले ह्यांनी प्रखर हल्ला चढविला. सावित्रीबाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगांव या गावी झाला. सन १८४० मध्ये त्यांचा विवाह ज्योतीराव फुलेशी झाला. ढोल गवॉंर शुद्र पशु नारी, सब ताडन के अधिकारी ! तुलशीदास (रामचरित मानस ) ह्या प्रमाणे मनुवादी व्यवस्थेत ’नारी’ ही सुध्दा शुद्रच होती. म्हणून शुद्राप्रमाणे स्त्रियांना सुध्दा शिक्षणापासून वंचीत ठेवले होते. शिक्ष...

Popular posts from this blog

चंद्रयान 3 चंद्रावर पोहचले

डोळ्यांचे आरोग्य कसे राखावे?

*🍀🍀डोळे  व आरोग्य*🍀🍀 १. डोळे हे मनुष्याला मिळालेले मोठे वरदान आहे. देवाने दिलेल्या या सुंदर अवयवाची आवश्‍यक ती काळजी घेणे आपल्याच हातात आहे. आजकाल सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचा मेकप वेगळा केला जातो व त्यामुळे सौंदर्यात भरच पडते. हे सौंदर्य जसे बाहेरून वाढवले जाते तसेच आतून सुद्धा डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. *२. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये अन्नपदार्थातून मिळतात.* *३. केशरी, लाल, नारंगी, रंगाची फळे व भाज्या*:  जीवनसत्व ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे कार्य उत्तम व नियमितपणे करण्यासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. खूप पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहोत की गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्‍यक आहे. केवळ गाजरच नाही तर केशरी, लाल, नारंगी रंगाची फळे व भाज्या यांमध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येऊ शकतो. तसेच रेटीना व कॉर्निया सारख्या डोळ्यातील अतिमहत्वाच्या भागांनाही कमकुव...

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस