क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे. तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...
*(१) मगर* 🐊 मगर हा पाण्यात व जमिनीवर राहणारा उभयचर प्राणी आहे. तो सरपटणारा मांसभक्षक प्राणी आहे. त्याचा जबडा खूप शक्तिशाली असतो. तो उन्हात तोंड उघडे करून आराम करतो, तेव्हा पक्षी त्याच्या दातात अडकलेले मांस खातात. कधीकधी पक्षी त्याचे भक्ष बनतात. मगर स्वतःची जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही. ----------------------------------------------------- *(२) कासव* 🐢 कासव हा उभयचर प्राणी आहे. त्याच्या पाठीवर जाड व टणक कवच असते. धोक्याची चाहूल लागताच कासव स्वतःला कवचाच्या आतमध्ये लपवितो. तो जमिनीवर अतिशय हळूहळू चालतो, परंतु पाण्यात तो चपळ आहे. कासव हा शाकाहारी असून तो वनस्पती खातो. तो शीतरक्ताचा प्राणी आहे. कासव हा दीर्घायुष्यी आहे. त्याचा जीवनकाल १०० वर्षापेक्षा जास्त आहे. ----------------------------------------------------- *(३) मासा* 🐟 ...