Skip to main content

Posts

Showing posts from January, 2020

Featured Post

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ   मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे.     तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...

मास्तरची व्यथा

मास्तरची व्यथा मास्तर आता कायमचे शहराकडे आलेत. पण सारी हयात वाड्या वस्त्यांवर तालुका मास्तर म्हणून घालवलेल्या मास्तरांचा जीव काही इकडे रमत नाही. वयाने आता थकलेत. "पण माज्या माघारी हातानं करून खाऊ नका! तुमचं सगळं आयुष्य उपासमारीतच गेलंय! आपल्या पोरांच्याकडं जाऊन रहावा!" असं अखेरचा श्वास घेताना मास्तरीनबाईनी सांगिल्यामुळे मास्तर शहरवाशी झालेत. मास्तरांची दोन्ही मुलं जवळ जवळच राहतात. थोरला ईस्टला तर धाकटा वेस्टला. पण रेल्वेलाईनवरचा तो लोखंडी ब्रिज ओलांडताना काळानुसार मास्तरांचे गुडघे आता भरून येतात. चढताना त्यांना धाप लागते. भर गर्दीत एखाद्या पायरीवर बसून राहतात. शहरात आल्यावर मास्तर धाकट्याकडे होते. नंतर नंतर त्या किचन मधली भांडी वाजल्यावर मास्तर आता सकाळचे थोरल्याकडे जेवतात. संध्याकाळी धाकट्याकडे. थोरला मुलगा मास्तरांशी जास्त बोलत नाही. पण त्याची बायको मास्तरांशी चांगलं वागते. धाकटा पोरगा चांगला आहे पण बायको नाही. तिला आल्या गेलेली घरी नको असतात. सतत धुसपुस करीत राहते. पण मास्तरांचा लेका सुनापेक्षा नातवंडातच जीव रमतो. आता तीच त्यांच्या जगण्याची आधार केंद्रे बनलीत... पहाटे ...

बहिर्जी नाईक यांचे गुप्तहेर खाते व त्याची स्वराज्यातील उत्तुंग कामगिरी

बहिर्जी नाईक यांचे गुप्तहेर खाते व त्यांची स्वराज्यातील उत्तुंग कामगिरी............. #स्वराज्याचे_गुप्तहेर_बहिर्जी_नाईक," मूळ बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलविण्यात पांरगतअसलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून मराठी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. महाराजांनी त्यांच्यातले कसब ओळखले स्वराज्यनिर्र्मितीच्या कामाला उपयोगी पडतील हे जाणून त्यांना त्या गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले. बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत, आदी कुठलेही वेशांतर करण्यात पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होते. ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व खुद्द अदिलश...

राजमाता जिजाऊ(संकलित लेख,लेखकाच्या नावासह साभार)

 (कॉपी पेस्ट लेखकाच्या नावासह साभार) रयतेच्या राज्यासाठी जिजाऊंचा संघर्ष आजही मार्गदर्शक आहे. राजमाता जिजाऊ जयंतीच्या सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा.त्यानिमित्ताने हा लेख 12जाने 2019 अभिवादनपर लिहलेला आहे,तो Re post करीत आहे. आवडल्यास निश्चित प्रतिक्रिया देणे,share/forward करणे. रामेश्वर त्रिमुखे, जालना. Mob.9420705653. जिजाऊ म्हणजे विदर्भाची कन्या,मराठवाड्याची सून, कर्मभूमी पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीचा परिसर,तर स्वराज्य राजधानी आणि देहत्याग कोकणात.त्यामुळे साक्षात संपूर्ण महाराष्ट्रात कार्य,कर्तृत्व आणि जीवन. राजमाता मासाहेब जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 ला सिंदखेड जिल्हा बुलढाणा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव म्हाळसाराणी होते.त्यांना दत्ताजी,अचलोजी, राघोजी आणि बहादुरजी हे भाऊ होते.जिजाऊंनी मराठी, फार्सी,संस्कृत,उर्दू,हिंदी, तेलगू या भाषा अवगत करून घेतल्या. याचबरोबर घोडेस्वारी,तलवारबाजी, राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना घरातूनच मिळाले. इसवीसन 1610 ला वेरुळचे भोसले घराण्यातील शहाजी भोसले यांच्याशी जिजाऊंचा विवाह वेरूळ येथे झाला. शहाजीमह...

अध्ययन निष्पत्ती

अध्ययन निष्पत्ती Post on Date ०६/०१/२०१७ मिञांनो, ३री व ४थी या इयत्तेसाठी मराठी विषयाअंतर्गत *"प्रतिसादात्मक बोलणे"* हा उपक्रम राबविला असता विध्यार्थांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. उपक्रमाचा मुख्य हेतू *चर्चेत सहभागी होणे व आपले स्वत:चे मत विशद करणे/ मांडणे* हा होता. *आई आपल्यासाठी काय काय करते?* हा विषय गटात चर्चेसाठी  दिला व मुलांना गटात प्रथम चर्चा करण्यास सांगितले व नंतर प्रत्येक विध्यार्थांना आईविषयी एक-एक वाक्य फलकावर स्वत:च्या शब्दात लिहिण्यास सांगितले असता मुलांनी सुंदर हस्ताक्षरात आईविषयी खुप चांगली वाक्यरचना तयार केली. मिञांनो,बरेचसे परिचित विषय गटात चर्चेसाठी ठेवू शकतो. जसे ~मी पाहिलेली जञा,  माझी सुंदर शाळा, माझे आवडते शिक्षक, आवडता खेळ आदि. अध्ययन निष्पत्ती~(०१) स्वत:चे शब्द स्वत:च्या शब्दात विशद केल्याचा आनंद होणे. (०२) प्रमाण भाषा व बोलीभाषा यातील फरकाची जाणीव होणे. (०३) भाषेच्या माध्यमातून विचारांचा विकास होणे. (०४) प्रसंगानुरूत, व्यक्तिनुसार  योग्य प्रकारे संवाद साधता येणे. (०५) आपले विचार, भावना, कल्पना व अनुभव व्यक्त करता येणे. (०६) लेखना...

Popular posts from this blog

चंद्रयान 3 चंद्रावर पोहचले

डोळ्यांचे आरोग्य कसे राखावे?

*🍀🍀डोळे  व आरोग्य*🍀🍀 १. डोळे हे मनुष्याला मिळालेले मोठे वरदान आहे. देवाने दिलेल्या या सुंदर अवयवाची आवश्‍यक ती काळजी घेणे आपल्याच हातात आहे. आजकाल सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचा मेकप वेगळा केला जातो व त्यामुळे सौंदर्यात भरच पडते. हे सौंदर्य जसे बाहेरून वाढवले जाते तसेच आतून सुद्धा डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. *२. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये अन्नपदार्थातून मिळतात.* *३. केशरी, लाल, नारंगी, रंगाची फळे व भाज्या*:  जीवनसत्व ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे कार्य उत्तम व नियमितपणे करण्यासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. खूप पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहोत की गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्‍यक आहे. केवळ गाजरच नाही तर केशरी, लाल, नारंगी रंगाची फळे व भाज्या यांमध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येऊ शकतो. तसेच रेटीना व कॉर्निया सारख्या डोळ्यातील अतिमहत्वाच्या भागांनाही कमकुव...

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस