क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे. तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...
✍ सर्वनाम नामऐवजी वापरल्या जाणार्या शब्दांला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामचे मुख्य प्रकार सहा आहेत. 1. पुरुषवाचक सर्वनाम 2. दर्शक सर्वनाम 3. संबंधी सर्वनाम 4. प्रश्नार्थक सर्वनाम 5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम 6. आत्मवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम : याचे तीन उपप्रकार पडतात. 1. प्रथम पुरुष : मी, आम्ही, आपण, स्वत: इ उदा. 1. मी गावाला जाणार. 2. आपण खेळायला जावू. 2 .व्दितीय पुरुष : तो, तुम्ही, आपण, स्वतः इ उदा. 1. आपण कोठून आलात? 2. तुम्ही घरी कधी येणार? 3. तृतीय पुरुष : तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ. उदा. 1. त्याने माला कामाला लावले पण स्वतःमात्र आला नाही. 2. त्या सर्वजण इथेच येत होत्या. दर्शक सर्वनाम : कोणतीही जवळची किंवा वा दूरची वस्तु दर्शविण्यासाठी दर्शक सर्वनामाचा उपयोग करतात. उदा. हा, ही, हे, तो, ती, ते. उदा. 1. ही माझी वही आहे 2. हा माझा भाऊ आहे. 3. ते माझे घर आहे. 4. तो आमचा बंगला आहे. संबंधी सर्वनाम : वाक्या...