Skip to main content

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांचे उत्तुंग यश

रेणुकादास देवणीकर आज तहसीलदार पदी विराजमान झाले आहेत;परंतु त्यांचा आजपर्यंतचा प्रवास हा नक्कीच काट्याकुट्यानी भरलेला आहे.देवणी सारख्या एका छोट्या गावातून एका शिक्षकाचा मुलगा तालुका दंडाधिकारी होतो ,ही नक्कीच भूषणावह बाब आहे,विशेष म्हणजे तेही एका दलित समूहातून असल्यामुळे या यशाला नक्कीच सोनेरी किनार आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.वडिलांचे छत्र हरवल्यानंतर रेणुकादास यांनी राजर्षी शाहू महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घेतला;पण या संस्कृतीत त्यांचा पिंड रमला नाही,त्यांनी घरच्यांना न सांगता उदगीर या तालुक्याच्या ठिकाणी कला शाखेत प्रवेश घेतला.वडिलांची प्रेरणा कायम सोबत होती.'मच्छिन्द्र सारखे टॉपला जा' हा वडिलांचा संदेश त्यांनी काळजात कोरला होता.मच्छिंद्र देवणीकर हे त्यांच्या भावकीतील व्यक्ती तेव्हा MPSC मार्फत निवड होऊन उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत होते.वडील गेल्यामुळे कसलेही मार्गदर्शन नव्हते,त्यामुळे आपण शोधावी तीच वाट,ती कधी खाच खळग्यांनी भरलेली ,तर काट्याने पाय आणि मनही कितीदा तरी रक्तबंबाळ झाले.पण चालणे थांबले नाही.बी ए झाले,एम ए झाले,पण हा बावन्नकशी हिरा झाकून राहिला तरच नवल! एम ए मध्ये 58 टक्के मार्क्स घेऊन आपले नाणे खणखणीत आहे हे दाखवून दिले.मग सुरू झाली भाकरीच्या शोधात भटकंती...नारायण सुर्वेंच्या भाकरीचा चंद्र सापडत नव्हता.महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात CHB साठी मुलाखत दिली पण टॉप असूनही निवड झाली नाही,तेव्हा या व्यवस्थेचा राग आला.मग सैनिकी शाळेत जागा निघाल्या,तिथेही अर्ज केला व प्रथम क्रमांकावर निवड झाली.पोटाचा प्रश्न मिटला होता,पण स्वाभिमानाची लढाई बाकी होती.मग वडिलांनी दाखवलेले स्वप्न झोपू देत नव्हते.सुरू झाला मग MPSC स्पर्धा परीक्षेचा संघर्ष! पहिल्याच प्रयत्नात मुख्य परीक्षा व मुलाखत दिली पण 1 गुणांहून मेरिट हुकले,तेव्हा अश्रूंचा बांध फुटला! पण ते डगमगले नाहीत त्याच जोमाने दुसरी परीक्षा:पूर्व,मुख्य,मुलाखत आणि नायब तहसिलदार पदी निवड!!! पण येथेही नशिबाने थोडा दगा दिलाच,6 गुणांमुळे वर्ग 1 चे पद हुकले! पण आता टॉपचा जीना चढायचा होता,नायब तहसिलदार ही त्याची पहिली पायरी होती.आज 10 वर्षांनंतर क्लास 1 पदी प्रमोशन होऊन वडिलांचे शब्द रेणुकादास यांनी खरे करून दाखवले आहेत.या प्रवासही काही साधा नव्हताच मुळी!अनेक कटू अनुभव पचवीत हा प्रवास पूर्ण केला.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे ज्या समाजात तुमचा जन्म झाला त्यांचा उध्दार करणे हे तुमचे कर्तव्य आहे.या कर्तव्याची जाणीव ठेवून कोणतेही काम ते पुढाकार घेऊन करतात.गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची अखंड धडपड सुरू असते.त्यांच्या या प्रवासाला मानाचा मुजरा!पुढील कार्यास प्रचंड शुभेच्छा!!!💐💐💐
https://twitter.com/drbalajisamukh1/status/1407941309801713668?s=08 

Comments

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस