Skip to main content

Featured Post

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो

🔅 खो-खो चे क्रीडांगण:-

🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्येक संघात दोन राखीव खेळाडू असतात. खेळताना एखादा खेळाडू जबर जखमी झाल्यास सरपंचाच्या परवानगीने राखीव खेळाडू खेळू शकतो; पण प्रतिस्पर्धी संघाच्या कप्तानाला ही गोष्ट सांगावी लागते.
बसलेल्या खेळाडूला पाठलाग करणा-याने मागून स्पर्श करून ‘खो’ म्हटले म्हणजे तो उठून पळणा-याचा पाठलाग करू लागतो आणि खो देणारा त्याची जागा घेतो. खो मिळाल्यावाचून खेळाडूने उठावयाचे नसते. पाठलाग करणा-याला दिशा बदलता येत नाही. उठल्याबरोबर त्या खेळाडूची स्कंधरेषा (दोन्ही खांद्यांना जोडणारी कल्पित रेषा) ज्या बाजूला वळलेली असेल, त्या बाजूलाच त्याला वळावे लागते किंवा ती मध्यपाटीस समांतर असेपर्यंत त्याला वळता येते. पाठलाग करणाराला खेळाडूंच्या मधून किंवा खुंटांमधून जाता येत नाही. खुंटाला वळसाच घालावा लागतो किंवा खांबाजवळील रेषेला स्पर्श करून पुन्हा परतता येते. चौकोनात पाठलाग करणाराला कसेही फिरता येते.
खेळणा-याने सीमारेषांत राहूनच खेळावयाचे असते. बसलेल्या खेळाडूंना त्याने स्पर्श केल्यास तो बाद होतो. प्रत्येक डाव लहान वयाच्या स्पर्धकांसाठी ५ मिनिटांचा आणि मोठ्यांसाठी ७ मिनिटांचा असतो. प्रत्येक डावानंतर २ १/२ मिनिटे आणि दोन डावांनंतर पाच मिनिटे विश्रांती असते. एका डावात जितके खेळाडू बाद होतील, तितके गुण विरुद्ध संघाला मिळतात. एखाद्या संघाचे गुण प्रतिस्पर्धी संघापेक्षा १२ गुणांनी जास्त असल्यास हा आघाडीवर असलेला संघ दुस-या संघास पुन्हा बसण्यास म्हणजे पाठलाग करण्यास सांगू शकतो. पाठलाग करताना नियमभंग केला, तर पंच ताबडतोब ती चूक सुधारावयास लावतात. त्यामुळे खेळणा-याच्या पाठलागात खंड पडून त्याला काही वेळ मिळतो. एका सामन्यासाठी प्रत्येक संघाला दोन वेळा खेळावे लागते.
खोखोच्या सामन्यासाठी दोन पंच, एक सरपंच, एक गुणलेखक आणि क्वचित प्रसंगी काही सामन्यांत वेळाधिकारी असतो. अन्यथा ही कामगिरी सरपंच पार पाडतो.
स्त्रोत: शिक्षक मंच

🔅 खो-खो ची कौशल्य:-

 🔅 खो खो च्या खेळामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक कौशल्य असावी लागतात. पाटीवर तुम्ही चौरसात कसे बसता? याला महत्व आहे. बुलेट पद्धत आणि सारखे पाय पद्धत या अशा बसण्याच्या दोन पद्धती आहेत.
१) खो देण्याची पद्धत सुद्धा अचूक हवी. मैदानावर खेळाची स्थिती कशी आहे, पळती करणारा खेळाडू किती चपळ आहे, हे हेरून खो देता आला पाहिजे.
२)उलट आक्रमण, सुलट आक्रमण, आक्रमक आक्रमण, बचावात्मक आक्रमण हे प्रत्येक खेळाडूला आले पाहिजे. तरच पाठलाग योग्य तऱ्हेने करता येऊन पळती करणाऱ्या खेळाडूस बाद करता येऊ शकेल.
३)'डांबावर सूर येणे' हे खो खो च्या खेळातील अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे. हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी तल्लख बुद्धी, निर्णय क्षमता आदी गोष्टी अत्यावश्यक असतात. हे डांबावर सूर घेण्याचे कौशल्य विजय मिळवण्यासाठी आवश्यक असते.
४)आक्रमक कौशल्या इतकेच बचावात्मक कौशल्य गरजेचे असते. पाठलाग करण्या बरोबर पळती करणेही महत्वाचे असते.
५) खो देणे हेही कौशल्याचे काम आहे. हूल देऊन खो देणे, पाय बदलून फसवा खो देणे, साधा फसवा खो, बसून फसवा खो,उभा राहून फसवा खो असे फसवे खो असे फसवे खो देता आले पाहिजे.

 🔅 खो-खो
खो या शब्दाचा अर्थ हुलकावणी देणे, चकविणे असा होतो. खो-खो वर खेळाची उभारणी हि अगदी अशीच करण्यात आलेली आहे.
खो-खोचा खेळ नैसर्गिकपणे वास करणार्‍या वृत्तींची जोपासना करणार्‍या त्या वृद्धिंगत करणारा, संपूर्ण शरीराला व्यायाम देणारा असा खेळ आहे. खो-खो खेळ म्हणजे केवळ पळापळी किंवा पाठशिवणी नव्हे तर मनुष्य मात्रात सुप्तपणे वावरणार्‍या शिकार साधण्याच्या ईच्छेचा तो एक सभ्य अविष्कार आहे. पळून जाणारे भक्ष व त्याहून अधिक वेगाने पळून आपल्या कब्जात आणणे हा सृष्टीचा नियम येथे प्रत्यही जाणवतो. त्यामुळे वेग हे या खेळाचे प्रमुख लक्षण आहे पण वेगाबरोबरच या खेळासाठी ताकद, जोम, उत्साह, बुद्धीचातुर्य, क्षमता, चपळता, आक्रमकता, बचाव, अचूक निर्णय क्षमता असणे आवश्यक आहे. खो-खो हा खेळ एक वेगवान व थरार निर्माण करणारा असून शिगेला पोहोचवणारी उत्सुकता निर्माण करणारा खेळ आहे.
खो-खो खेळामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होते कारण हा खेळ खेळताना शरीराच्या सर्व भागांचा समावेश होतो. त्यामुळे हा खेळ शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे.
तसेच खो-खो खेळाने सामाजिक एकोपा, अखंडत्व वाढीस लागते. खेळाडूंमध्ये नेतृत्वगुण, खिलाडीवृत्ती, संघ भावना वाढीस लागते.
ज्येष्ठ सांख्यिकीतज्ञ श्री. रमेश वरळीकर म्हणतात कि खो-खो एक आकर्षक एक गतिमान खेळ भारतात आता चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. वेळेबरोबर धावणारा गुणफलक हा या खेळाचा गाभा आहे.
गती, कस आणि कौशल्य यांचा त्रिवेणी संगम ज्या खेळात आहे असा हा खेळ खो-खो जोरदार पाठलाग आणि तितकीच चपळ हुलकावणी यांची अपूर्व झुंज म्हणजे खो-खो “पायात कोणत्याही प्रकारचे बूट न घालता खेळला जाणारा गतिमान खेळ म्हणून खो-खो पूर्ण भारतात परिचित आहे.

Comments

Popular posts from this blog

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक य

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस