Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

Featured Post

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ   मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे.     तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...

तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांचे उत्तुंग यश

रेणुकादास देवणीकर आज तहसीलदार पदी विराजमान झाले आहेत;परंतु त्यांचा आजपर्यंतचा प्रवास हा नक्कीच काट्याकुट्यानी भरलेला आहे.देवणी सारख्या एका छोट्या गावातून एका शिक्षकाचा मुलगा तालुका दंडाधिकारी होतो ,ही नक्कीच भूषणावह बाब आहे,विशेष म्हणजे तेही एका दलित समूहातून असल्यामुळे या यशाला नक्कीच सोनेरी किनार आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.वडिलांचे छत्र हरवल्यानंतर रेणुकादास यांनी राजर्षी शाहू महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घेतला;पण या संस्कृतीत त्यांचा पिंड रमला नाही,त्यांनी घरच्यांना न सांगता उदगीर या तालुक्याच्या ठिकाणी कला शाखेत प्रवेश घेतला.वडिलांची प्रेरणा कायम सोबत होती.'मच्छिन्द्र सारखे टॉपला जा' हा वडिलांचा संदेश त्यांनी काळजात कोरला होता.मच्छिंद्र देवणीकर हे त्यांच्या भावकीतील व्यक्ती तेव्हा MPSC मार्फत निवड होऊन उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत होते.वडील गेल्यामुळे कसलेही मार्गदर्शन नव्हते,त्यामुळे आपण शोधावी तीच वाट,ती कधी खाच खळग्यांनी भरलेली ,तर काट्याने पाय आणि मनही कितीदा तरी रक्तबंबाळ झाले.पण चालणे थांबले नाही.बी ए झाले,एम ए झाले,पण हा बावन्नकशी हिरा झाकून र...

बीजांड ते ब्रह्मांड----डॉ महेंद्र वंटे

त्रिकाल सत्य: एक अतिशय सुंदर लेख नक्की वाचा! खूप पूर्वीचा *"बिजांड ते ब्रम्हांड"* हा *डॉ. महेन्द्र वंटे* यांचा लेख वाचनांत आला. हा लेख वाचल्यावर हे एका डॉक्टरचे शब्द आहेत यावर विश्वासच बसत नाही! हे शब्द असेच सुचले नाहीत तर ते त्यांच्या शब्दामधून त्यांच्या अंतर्मनातील भाव, आईचे प्रेम आणि तिच्या प्रति असलेली कृतज्ञतेची तळमळ व्यक्त होतेय.   *नक्की वाचा!*  खात्री आहे की हा लेख वाचल्यावर आपणसुद्धा आपल्या अंतर्मनाशी बोलल्याशिवाय राहणार नाही. *बीजांड ते ब्रह्मांड :* वयोपरत्वे तोल जाऊन पडल्याने आई अंथरुणाला खिळली ती कायमचीच. सर्व अवयव नव्वदीतले. झिजलेल्या कंबरेवरचा मुक्कामार तिला कायमचा परावलंबी करून गेला. पाय उचलणं सुद्धा अशक्य झालं. तिच्या संवेदना कमी झाल्याने सगळे सोपस्कारही कपड्यातच. वृद्धत्व सोडून दुसरा आजार नव्हता. पण म्हातारपण म्हणजे सुकून जिर्ण झालेलं बालपण. तोच हटवाद आणि वागणंही तसंच लहरी. सल्ला मसलतींचा पाउस पडला. लाख मोलाच्या आईसाठी काही हजाराची केअरटेकर! मनाला पटेना. अनेक पर्यांयांचा उहापोह झाला. आम्हा दोघांची कामं अत्यावश्यक सेवेतली. सलग सुट्ट्यांचादुष्काळ. मग मीच ठर...

Popular posts from this blog

चंद्रयान 3 चंद्रावर पोहचले

डोळ्यांचे आरोग्य कसे राखावे?

*🍀🍀डोळे  व आरोग्य*🍀🍀 १. डोळे हे मनुष्याला मिळालेले मोठे वरदान आहे. देवाने दिलेल्या या सुंदर अवयवाची आवश्‍यक ती काळजी घेणे आपल्याच हातात आहे. आजकाल सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचा मेकप वेगळा केला जातो व त्यामुळे सौंदर्यात भरच पडते. हे सौंदर्य जसे बाहेरून वाढवले जाते तसेच आतून सुद्धा डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. *२. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये अन्नपदार्थातून मिळतात.* *३. केशरी, लाल, नारंगी, रंगाची फळे व भाज्या*:  जीवनसत्व ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे कार्य उत्तम व नियमितपणे करण्यासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. खूप पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहोत की गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्‍यक आहे. केवळ गाजरच नाही तर केशरी, लाल, नारंगी रंगाची फळे व भाज्या यांमध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येऊ शकतो. तसेच रेटीना व कॉर्निया सारख्या डोळ्यातील अतिमहत्वाच्या भागांनाही कमकुव...

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस