Skip to main content

Posts

Featured Post

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ   मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे.     तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस

चंद्रयान 3 चंद्रावर पोहचले

सद्भावना दिवस

क्रांतिगुरु लहुजी साळवे या ग्रंथाची दुसरी आवृत्ती लवकरच आपल्या भेटीला...

यशोदीप पब्लिकेशन पुणे घेऊन येत आहे क्रांतिगुरु लहुजी साळवे या महाग्रंथाची अल्पावधीतच दुसरी आवृत्ती... 'क्रांतीगुरू लहुजी साळवे' या संपादीत ग्रंथाची दुसरी आवृत्ती १४ नोव्हेंबर २०२२ रोजी क्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त यशोदीप पब्लिकेशन्स पुणे यांनी प्रकाशित केली आहे.आपणास ग्रंथ हवे असेल तर नोंदणी करा.पृष्ठ संख्या २७५असू ग्रंथांचे मूल्य ४५० रूपये आहे. ग्रंथ हवे असल्यास ४००रूपये ९९२२९६६५२६ या नंबरवर फोन पे करावे ही विनंती

९५ व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वांनी यायचं हं...

९५ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर जि लातूर या ऐतिहासिक शहरात २२,२३,२४एप्रिलमध्ये संपन्न होत आहे.ही लातूर जिल्ह्यातील साहित्यिकांसाठी एक मोठीच पर्वणी आहे!तेव्हा जिल्ह्यातील सर्वांनी अगदी झाडून उपस्थिती लावायची.कार्यक्रम भरगच्च आहेत. भारताचे महामहिम राष्ट्रपती मा.रामनाथजी कोविंद साहेब हे उपस्थित राहून संमेलनाला चार चांद लावणार आहेत.शिवाय बडे बडे राजकारणी ,अभिनेते, हास्य कलाकारांना आमंत्रित केले आहे.हे दिमाखदार साहित्य संमेलन आपण याची देही याची डोळा अनुभवले पाहिजे. यासाठीच हेआग्रहाचे निमंत्रण आहे बरे...सर्वांनी या साहित्य यात्रेला नक्की यायचं हं... आपला डॉ बालाजी रुक्मिणबाई राजाराम समुखराव हाडोळी ता चाकूर जि लातूर.

क्रांतिगुरु लहुजी साळवे ग्रंथ मिळवा

* क्रांतिगुरु लहुजी साळवे* हा परिवर्तनवादी चळवळी साठी मोठाच संदर्भग्रंथ ठरावा असा ग्रंथराज आपणासाठी उपलब्ध झाला आहे.महाराष्ट्रातील 46 मान्यवर अभ्यासक , संशोधक,लेखक,चिंतक, चळवळीतील कार्यकर्ता यांच्या साक्षेपी लेखणीतून निर्मित झालेला हा अमूल्य असा ग्रंथराज आहे.आजपर्यंत *क्रांतिगुरु लहुजी साळवे* यांच्यावर उपलब्ध असलेल्या ग्रंथांपैकी सर्वोत्तम असा हा ग्रंथ आहे. *क्रांतिगुरु लहुजी साळवे* यांच्या ऐतिहासिक कार्याचे संशोधक दृष्टीतून तर्कशुद्ध विवेचन करण्यात आले असून त्यांच्या प्रत्येक पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्यांच्यावर घेतले जाणारे आक्षेप साधार खोडून काढले आहेत.तेव्हा असा हा सर्वांगाने विचार करणारा आणि वाचकाला विचार करायला लावणारा महाग्रंथ आपल्या सेवेत रुजू करताना संपादक म्हणून आम्हांला नक्कीच आनंद होत आहे.*इतिहास लेखन* कसे असले पाहिजे याचा उत्तम नमुना म्हणून या महाग्रंथाकडे पाहता येईल.    ग्रंथाचे मुखपृष्ठ औरंगाबाद येथील चळवळीतील कार्यकर्ता एक मनस्वी कलावंत *सरदार जाधव* यांनी रेखाटले असून इतिहासाबद्दल आवड आणि वर्तमानाचे भान ठेवायला लावणारे...

Popular posts from this blog

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्...

चंद्रयान 3 चंद्रावर पोहचले

डोळ्यांचे आरोग्य कसे राखावे?

*🍀🍀डोळे  व आरोग्य*🍀🍀 १. डोळे हे मनुष्याला मिळालेले मोठे वरदान आहे. देवाने दिलेल्या या सुंदर अवयवाची आवश्‍यक ती काळजी घेणे आपल्याच हातात आहे. आजकाल सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांचा मेकप वेगळा केला जातो व त्यामुळे सौंदर्यात भरच पडते. हे सौंदर्य जसे बाहेरून वाढवले जाते तसेच आतून सुद्धा डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. *२. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये अन्नपदार्थातून मिळतात.* *३. केशरी, लाल, नारंगी, रंगाची फळे व भाज्या*:  जीवनसत्व ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे कार्य उत्तम व नियमितपणे करण्यासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. खूप पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहोत की गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्‍यक आहे. केवळ गाजरच नाही तर केशरी, लाल, नारंगी रंगाची फळे व भाज्या यांमध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येऊ शकतो. तसेच रेटीना व कॉर्निया सारख्या डोळ्यातील अतिमहत्वाच्या भागांनाही कमकुव...