Skip to main content

Posts

Featured Post

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ

क्रांतीगुरू लहूजी साळवे संदर्भग्रंथ   मित्रहो सप्रेम नमस्कार!आज आपणास एक नवीन आनंदाची बातमी देताना मला मनस्वी आनंद होत आहे की,अगदी काही दिवसांत डॉ सुशीलप्रकाश चिमोरे सर,(संशोधन मार्गदर्शक व मराठी विभाग प्रमुख,श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर ) व मी आम्ही दोघांनी मिळून "क्रांतीगुरू लहूजी साळवे" हा खूपच मोलाचा संदर्भग्रंथ प्रकाशित करत आहोत. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की,महाराष्ट्रातील व बाहेरच्या राज्यातील 'संशोधनातील बाप'लोकांनी लेख पुरवून या संदर्भग्रंथाची उंची हिमालयाएवढी वाढवली आहे.     तसे पाहता क्रांतीगुरू लहूजी साळवे हे इतिहासातील एक (दुर्लक्षित) "सोनेरी पान" आहे.इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.असो पण म्हणूनच आम्ही ठरवले की,या सोनेरी पानावर प्रकाश टाकायचा.अन मग सुरु झाला या ग्रंथ निर्मितीचा प्रवास!हा खरेतर खूपच कष्टप्रद असा प्रवास होता पण आम्ही ठरवले म्हणजे चित्रपटातील सलमान खान सारखी आमची स्थिती होते;"एक बार हमने कमीटमेंट कर दी तो हम खुद की भी नही सुनते". मग मार्ग कितीही खडतर असो.यासाठी तसे पहिले तर खूप उशीर झाला आहे;त्याबद्दल आपली मनःपूर्...

प्राणी माहिती

               *(१) मगर* 🐊        मगर हा पाण्यात व जमिनीवर राहणारा उभयचर प्राणी आहे. तो सरपटणारा मांसभक्षक प्राणी आहे. त्याचा जबडा खूप शक्तिशाली असतो. तो उन्हात तोंड उघडे करून आराम करतो, तेव्हा  पक्षी त्याच्या दातात अडकलेले मांस खातात. कधीकधी पक्षी त्याचे भक्ष बनतात. मगर स्वतःची जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही. -----------------------------------------------------               *(२) कासव* 🐢        कासव हा उभयचर प्राणी आहे. त्याच्या पाठीवर जाड व टणक कवच असते. धोक्याची चाहूल लागताच कासव स्वतःला कवचाच्या आतमध्ये लपवितो. तो जमिनीवर अतिशय हळूहळू चालतो, परंतु पाण्यात तो चपळ आहे. कासव हा शाकाहारी असून तो वनस्पती खातो. तो शीतरक्ताचा प्राणी आहे. कासव हा दीर्घायुष्यी आहे. त्याचा जीवनकाल १०० वर्षापेक्षा जास्त आहे. -----------------------------------------------------                *(३) मासा* 🐟     ...

सावित्रीबाई फुले

।। युग स्त्री-सावित्रीबाई ज्योतिबा फुले ।। परदेशातून भारतात आलेल्या आर्यांनी परमेश्वराच्या नावाने चार वर्णाची निर्मिती करुन मूळ रहिवाशी भारतीयांना शुद्र वर्णात टाकले. ह्या शुद्रांना (आजचा बहुजन समाज ) ६००० जातीमध्ये विभागून त्यांच्यात उच्चनीचतेची विषारी भावना रुजविली. बहुजन समाजाला दैववादी व अंधश्रध्दाळू बनवीले व आपल्या भजनी लावले. काल्पनिक देवधर्माच्या, स्वर्ग-नरकाच्या व पाप-पुण्याच्या मोहजालात गुरफटवून मानसिक व शारिरीक गुलामगिरीत बहुजानांना बंदिस्त करुन ठेवले. हा प्रकार गेली पांच हजार वर्षापासून या देशात चालत आलेला आहे. अशा मनुवादी जाचक व अनिष्ठ रुढी परंपरेवर म. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले ह्यांनी प्रखर हल्ला चढविला. सावित्रीबाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगांव या गावी झाला. सन १८४० मध्ये त्यांचा विवाह ज्योतीराव फुलेशी झाला. ढोल गवॉंर शुद्र पशु नारी, सब ताडन के अधिकारी ! तुलशीदास (रामचरित मानस ) ह्या प्रमाणे मनुवादी व्यवस्थेत ’नारी’ ही सुध्दा शुद्रच होती. म्हणून शुद्राप्रमाणे स्त्रियांना सुध्दा शिक्षणापासून वंचीत ठेवले होते. शिक्ष...

ययाती कादंबरीचा परिचय

📕        📖 📖 *पुस्तक परिचय* ➡  🌹 *ययाती* 🌹 *ययाती......*  वि.स.खांडेकर  ✍🏻 या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबध नसून ही कादंबरी पौराणिक घटना एकत्र करुन स्वातंत्र्य रित्या मांडली आहे. पुराणकथा म्हणजे खुप काहि भव्य आणि भयंकर लढा हे जास्त आढळुन येते पण ह्या कांदबरी ठराविक घटना घेऊन जीवन हे एक क्षणाभंगूर तसेच दुस-या बाजूने ते चिरंतर, भौतिक व आत्मिक आहे हे सांगितले. बहुतांवशी आपण पुराणकथेत त्यांचे संर्घष व लढा पाहतो त्या लढाईसाठी केलेले डावपेज पाहतो परंतु ह्या कथेत एका राजाच्या जीवनातील खाचखळगे दाखविले आहे. त्याची मांडणी सहज व साध्या पद्धतीने आपल्यासमोर मांडली आहे. त्यांची शृंगारिक भाषाशैली ही खुप सुरेख आहे. कथा तशी छोटीच आहे पण त्यातील भाषाशैली व त्या काळात दृश्य आपल्यासमोर खुप व्यवस्थित रित्या मांडले आहे. ययाती ह्या कांदबरीची सुरवातच खुप छान केली आहे. " राजे राण्यांच्या गोष्टी लोक मोठ्या आवडीने ऎकतात त्यांच्या प्रेमकथात तर जगाला फार गोडी वाटते. मोठे कवी त्या कथांवर काव्ये रचतात" पण ही कहाणी एक प्रेम कथा छे ती ती कसली कथा आहे कोणाल...

प्र के अत्रे यांचा 7 डिसेंबर 1956 चा लेख

आचार्य अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली आदरांजली जी बऱ्याच वाचकांना माहीत नाही अश्या नावागत वाचकांसाठी ....... अतिशय उपयुक्त आणि ऐतिहासिक ठेवा असा हा लेख असून इतर बंधू भगिनींना वाचणे साठी जास्तीत जास्त शेअर व्हावा ही सदिच्छा भारताचा उध्दारकर्ता महात्मा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  - आचार्य प्र. के. अत्रे ***************************                                पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड - मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुध्द उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव तत्पर असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेलं सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडाच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारे वाघ...

तांड्यावर तिरंगा फडकला

तांड्यावर तिरंगा फडकला ...!! “विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेली,नीतीविना गती गेली,गतीविना वित्त गेले,वित्ताविना शुद्र खचले,इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले.” हे महात्मा फुले यांचे सुवचन मानवी जीवनात विद्येचे अनन्यसाधारण महत्त्व विशद करणारे आहे.विद्या नसेल तर माणूस गुलाम बनतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी, “गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल” असे म्हटले आहे.मानवी जीवनात विद्येचे महत्त्व या दोन्ही महापुरुषांनी स्पष्ट केले आहे.शिक्षण नसेल तर मानवी प्रगतीत गतिरोध निर्माण होतो.शिक्षणापासून कोसो मैल दूर असलेल्या कर्नाटक सीमेलगत वसलेल्या देवणी तालुक्यातील विळेगावजवळील राम-लक्ष्मण तांड्यावर शिक्षणाची पहाट कशी उजाडली त्याची ही कथा...        दि.२७ नोव्हेंबर १९९९ हा दिवस राम-लक्ष्मण तांडा विळेगाव येथील रहिवाशांच्या जीवनात सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा असाच आहे.कारण याच दिवशी या तांड्यावर शिक्षणाची नवी पहाट उजाडली.डी.पी.ई.पी.अंतर्गत पहिल्यांदाच प्राथमिक शाळा सुरु झाली आणि वर्षानुवर्षे अंधारमय जीवन जगणाऱ्या तांडावासीयांच्या आयुष्यात शिक्षणाचा नवीन सूर्यो...

नाणेघाट किल्ला :माहिती

          🔹 महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ🔹    ════════════════       *🔴 नाणेघाट किल्ला 🔴* ━━━━━━━━━━━━━━━━ *नाणेघाट किल्ला* *१) जाण्याचा मार्ग :* नाणेघाटाला यायचे झाल्यास मुंबई किंवा पुणे गाठावे. मुंबईकरांना नाणेघाटाला यायचे असल्यास कल्याण मुरबाड मार्गे वैशाखरे गावी यावे. वैशाखरे हे जरी पायथ्याचे गाव असले तरी तेथे न उतरता वैशाखरे पासून पुढे दोन कि.मी. अंतरावर असलेल्या नाणेघाट या नामनिर्देशित फलकाच्या मार्गाने थेट दोन तासात आपल्याला नाणेघाटावर पोहचता येते. या वाटेवर पावसाळ्यात दोन ओढ्यांचे दर्शन होते. पुण्याहून नाणेघाटाला यायचे झाल्यास पुणे-जुन्नर एस.टी. पकडून जुन्नरला यावे. जुन्नर ते घाटघर एस.टी पकडून घाटघरला यावे. येथपर्यंत पोहचण्यास दीड तास लागतो. घाटघर वरून ५ कि.मी. चालत नाणेघाट गाठता येतो. *२) माहिती :* नाणेघाट या नावावरूनच आपल्याला कल्पना येईल की हा घाट फारच पुरातन आहे. नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला. प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी. सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान (जुन्नर) या राजमार्गावर नाण...

OPPOSITE WORDS

🌷OPPOSITE  WORDS🌷 *🐜 🅰 🍎*  absent × present accept × decline, refuse accurate × inaccurate admit × deny advantage × disadvantage agree × disagree alive × dead all × none, nothing always × never ancient × modern answer × question apart × together appear × disappear, vanish approve × disapprove arrive × depart artificial × natural ascend × descend attractive × repulsive awake × asleep *🏃🏼 🅱 🏏* backward × forward bad × good beautiful × ugly before × after begin × end below × above bent × straight best × worst better × worse, worst big × little, small black × white blame × praise bless × curse bitter × sweet borrow × lend bottom × top boy × girl brave × cowardly build × destroy bold × meek, timid bound × free bright × dim, dull brighten × fade broad × narrow *🐈 C 🐄* calm × windy, troubled capable × incapable careful × careless cheap × expensive cheerful × sad, discouraged, dreary clear × cloudy, opaque clever × stup...

Popular posts from this blog

चंद्रयान 3 चंद्रावर पोहचले

खो-खो खेळाची माहिती

खेळ:-खो-खो 🔅 खो-खो चे क्रीडांगण:- 🔅१११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्...

प्रशिक्षण 3 रा टप्पा : सेल्फी विथ सक्सेस